तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 3 March 2019

लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण व गोपीनाथजी मुंडे अभियांत्रिकी महाविद्यालय, नाशिक च्या नवीन इमारत उद्घाटन आज पार पडलेबाळू राऊत मुंबई जिल्हा प्रतिनिधी 
मुंबई : दि.३भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी गोपीनाथ मुंडे यांचा गौरव लोकनेता (लोकनायक) असा केला होता. लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण व लोकनेते गोपीनाथजी मुंडे अभियांत्रिकी महाविद्यालय, नाशिक च्या नवीन इमारत उद्घाटन सोहळा आज खा.शरदचंद्र पवार यांच्या शुभहस्ते तर ना.पंकजाताई मुंडे आणि छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा लोकसंपर्क, अन्यायाविरुद्ध संघर्षाची नुसतीच तयारी नव्हे तर जिद्द, नवा विचार, नवे तंत्रज्ञान एकूणच जे नवे चांगले ते हवे, असा उत्साह असलेल्या गोपीनाथ मुंडे या तरुणाने भाजपला जनमानसात स्थान मिळवून दिले आणि विशेषतः उपेक्षित-शोषित वर्गात एक विश्वास निर्माण केला,आणी ते जनतेचे कैवारी झाले.
सदर समारंभास आमदार सर्वश्री बाळासाहेब थोरात, जितेंद्र आव्हाड, बाळासाहेब सानप, सीमा हिरे, देवयानी फरांदे, समीर भुजबळ, नरेंद्र दराडे, अनिल कदम, राहुल आहेर, हेमंत टकले, किशोर दराडे, खा. हरिश्चंद्र चव्हाण, माजी आमदार सर्वश्री दिलीप बनकर, जगन्नाथ धात्रक, वसंत गीते, तुकाराम दिघोळे आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment