तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 17 March 2019

पुणे येथे नैसर्गीक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेकडुन निता लांडे सन्मानितपुणे येथील कार्यक्रमात पार पडला सत्कार सोहळा

फुलचंद भगत(जिल्हा प्रतिनिधी)
वाशिम- दि.1 7-3-2019 ला नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या वतीने अंकुश लांडगे नाट्य सभागृह भोसरी पुणे येथे पहिले वार्षिक पर्यावरण स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते.या कार्यक्रमामध्ये वाशिम जिल्ह्यातील वसुंधरा टिमच्या अध्यक्षा तथा सामाजीक कार्यकर्त्या निता लांडे यांचा सन्मानचिन्ह,प्रमाणपञ आणी शाल तसेच रोपटे देवुन मान्यवरांनी सन्मानित केले.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विठ्ठल जाधव, ऊमाजी बिसेन, नैसर्गिक पर्यावरण चे राष्ट्रीय अध्यक्ष सुयोग धस, दीपक भवर, गणेश गरुड, तिरके, वर्षा भांडारकर, कमलताई सावंत, विद्याताई जाधव, रंगनाथ नाईकडे व इतर पर्यावरण प्रेमी उपस्थित होते कार्यक्रमांमध्ये प्रत्येक जिल्ह्यांमधून उत्कृष्ट पर्यावरणाचे कार्य करणाऱ्यांना चा सन्मानचिन्ह . रोपटे व शाल देऊन सन्मानित करण्यात आले वाशिम जिल्ह्यांमधून वसुंधरा टीम अध्यक्षा नीता लांडे यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मान करण्यात आला.वाशिम जिल्ह्यातील निता लांडे या वसुंधरा टिमच्या माध्यमातुन नैसर्गीक पर्यावरण संवर्धनासाठी  काम करीत असुन महिलांचे संघटन करुन विधायक आणी विविध सामाजीक ऊपक्रमामध्ये तसेच स्ञीयांच्या सबलीकरणासाठी नेहमी काम करीत असतात.स्ञीयांना स्वबळावर ऊभे करुन सामाजीक कार्यासाठीही संघटनेचा ऊपयोग करुन स्ञीयाही कुठल्याही क्षेञात मागे नाहीत याचे ऊत्तम ऊदाहरण ठरत आहेत.निता लांडे यांच्या पुणे येथे झालेल्या सत्कारामुळे वाशिम जिल्ह्याला मानाचा तुरा रोवला गेला असुन त्यांचे सर्वञ कौतुक होत आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835

No comments:

Post a Comment