तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 11 March 2019

जिंतूर म्हणजे जिंकण्यासाठी आतूर लोकांचे गाव! - अनिल घेर्डीकर   जिंतूर  उपविभागातील पोलीस उपअधीक्षक अनिल घेर्डीकर यांची रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात प्रशासकीय बदली झाल्याने शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या वतीने शब्दसह्याद्री प्रतिष्ठान समन्वयातून रविवार १० मार्च रोजी अनि घेर्डीकर यांना तहसिल कार्यालय जिंतूर येथे तहसीलदार सुरेश शेजूळ यांच्या अध्यक्षतेखाली, डाॅ.श्रीधर भोंबे, मुख्याध्यापक के.सी.घुगे यांच्या उपस्थितीत निरोप देण्यात आला आहे. प्रसंगी उपरोक्त उद्गार मावळते उपविभागीय अधिकारी अनिल घेरडीकर यांनी काढले.

जिंतूर उपविभाग परभणी जिल्ह्यात प्राकृतिक, सामाजिकदृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण भाग, उपविभागामध्ये नियुक्त झाल्यापासून पोलीस उपविभागीय अधिकारी अनिल घेर्डीकर यांनी प्रशासन व जनता यांच्यात सलोख्याचे वातावरण निर्माण करण्यासाठी सर्व जाती धर्मातील सुज्ञ व प्रतिष्ठित नागरिकांना एका व्यासपीठावर आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. त्यासोबतच कायद्याच्या अधीन राहून शहराची शांतता सुव्यवस्था व एकात्मता अखंडित ठेवण्यामध्ये त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. निवडणूकी पूर्व प्रशासन बदलामुळे जिंतूर उपविभाग मधील त्यांचे कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांची नुकतीच रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील उपविभागामध्ये पोलिस उपअधीक्षक म्हणून प्रशासकीय बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जिंतूर उपविभागामधील यशस्वी कार्याला शब्दवैभवाने गौरविण्यासाठी शहरातील अॅड.मनोज सारडा, अॅड.विनोद राठोड,अॅड.निकाळजे, डॉ.विवेक थिटे, डॉ. संतोष दराडे, डॉ. प्रभाकर अंभोरे, प्रा.पांडुरंग निळे,  प्रा.राजू वाकळे, कमलकिशोर जैस्वाल, अशोक शेळके, पत्रकार रियाझ चाऊस, व्यापारी प्रदीप राठी, अंभोरे सर आदींची उपस्थिती होती.
     कार्यक्रम प्रास्ताविक व सुञसंचलन प्रा.बाळू बुधवंत यांनी तर आभार डाॅ. दुर्गादास कान्हडकर यांनी मांडले.

No comments:

Post a Comment