तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 18 March 2019

रुग्ण सेवेतून मनस्वी समाधान मिळते - डाॅ. अशोक थोरात

सुभाष मुळे..
----------------
गेवराई, दि. १७ ( प्रतिनिधी ) सरकारी रूग्णालयात गरीब जनतेला सेवा मिळते, त्यामुळे अशी रूग्णालये त्यांच्यासाठी हक्काचे घर असते, या उपचारांसाठी असलेल्या घराचे घरपण टिकवून ठेवण्यासाठी समाजातल्या दानशूर घटकांनी पुढे येऊन सहकार्य करावे असे सांगून करत असलेल्या रुग्ण सेवेतून मनस्वी समाधान मिळते असे मौलिक प्रतिपादन जिल्हा चिकित्सक डाॅ. अशोक थोरात यांनी येथे केले.
     गेवराई येथे सोमवार, दि १८ मार्च रोजी दुपारी तीन वाजता बीड जिल्हा रूग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. थोरात यांनी दानशूर नागरीकांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. राजेश शिंदे, डाॅ. पंडीत, डाॅ. प्रवीण सराफ, डाॅ. आंधळे , डाॅ. जमादार, डाॅ. हेमंत वैद्य डॉ. अजयसिंह पंडित, विद्या बोर्डे, इन्चार्ज सुगडे, सीमा दुबे, एक्सरे विभागाचे अशोक कुटे, मंगेश खरात, चांगदेव कुटे, घनश्याम वैष्णव, गणेश नाईक, राजकुमार भुतडा यांच्यासह गेवराई डॉक्टर असोसिएशनचे सर्व सदस्यांची यावेळी उपस्थिती होती. पुढे बोलताना डाॅ. थोरात यांनी सांगितले की, जिल्ह्यात गेवराई उपजिल्हा रुग्णालयाने आदराचे नाव केले आहे. वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व समाजातील सर्व घटकांनी येऊन रूग्णालयाचे स्वरूप बदलले असल्याचा मला अभिमान वाटतोच आणि आनंद असल्याचे ते म्हणाले. सरकारी दवाखान्यात गरीबांना सेवा दिली जाते. परंतू अनावधानाने झालेल्या एखाद्या चुकीमुळे सगळ्या विभागाला टार्गेट केले जाते, तेव्हा मनाला वेदना होतात. त्यामुळे समाजाने व माध्यमांनी आम्हाला समजून घ्यावे एवढीच आपली अपेक्षा डाॅ. थोरात यांनी शेवटी बोलताना व्यक्त केली. प्रस्ताविक वैद्यकीय अधिक्षक राजेश शिंदे यांनी केले. ते म्हणाले की, शहरातल्या समाजातील जबाबदार नागरिकांनी स्वतःहून पुढे आले आणि रुग्णालयाच्या गरजेनुसार साहित्य व साधनं देणगीच्या स्वरूपात सुपुर्द करू लागले आहेत ही बाब माझ्यासाठी खुप समाधानकारक बाब आहे.  या तीन महिन्यांत गेवराई शहरातील नगरसेवक मंडळीनी १० खाटा व डोळ्याच्या कक्षाला फॅन, पडदे, कलर, खिडक्यांची तावदाने दान केले, आरबीसके डॉक्टरांच्या टीम ने १०० बेडशीट दिले. डॉ. रांदंड यांनी फ्रीज व रूग्णालयाचे कर्मचारी ओटी यांनी फॉगेर मशीन, डॉ.ओम भुतडा व डॉ. महेश कुलकर्णी यांनी प्रत्येकी १० खाटा, रुग्णालयातील अनिता व शोभा मावशी यांनी ५ खाटा व अफसर भाई यांनी २० खाटा अश्या एकूण ५५ खाटा दानशूर नागरीकांनी दान करून बांधिलकी जोपासली असल्याचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ. शिंदे यांनी सांगितले.
         गेवराई शहरातील प्रतिष्ठीत व्यापारी तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ. ओमप्रकाशजी भुतडा, डॉ. महेशजी कुलकर्णी यांच्यासह विविध घटकांनी रूग्णालयाला केलेल्या सहकार्या बद्दल उपस्थितांनी कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डाॅ. जमादार यांनी करून बालरोगतज्ज्ञ डाॅ. प्रवीण सराफ यांनी आभार मानले.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a comment