तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 1 March 2019

अ‍ॅड.संतोष पवार यांची नोटरीपदी नियुक्ती


अंबाजोगाई (प्रतिनिधी)- भारत सरकारच्या विधी व न्याय विभागाच्या वतीने देशातील नोटरीवर नियुक्ती झालेल्या वकीलांची यादी जाहिर झाली असून यात अंबाजोगाईचे अ‍ॅड.संतोष पवार नियुक्ती करण्यात आली आहे.
विधी व न्याय विभागाच्या वतीने देशातील नोटरीच्या पदी निवड झालेल्या वकीलांची यादी गुरूवारी जाहिर करण्यात आली. संतोष पवार यांनी 2002 साली वकीली व्यवसायाला सुरूवात केली. न्यायालयीन कामकाजाबरोबरच सामाजिक उपक्रमात त्याचा मोठा वाटा आहे. त्यांचे आधार माणुसकी हे एक प्रतिष्ठाण असून या प्रतिष्ठाणने अनेक गरजूवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, गणवेश  वाटप करून त्यांना आधार देण्याचे काम केले आहे. तसेच आत्महत्या ग्रस्त कुटुंबातील मुलींचा लोकसहभागातून विवाह देखील त्यांनी घडवून आणलेले आहे. सामाजिक उपक्रमात त्यांचे महत्वाचे काम असले तरी वकील व्यावसाय देखील त्यांनी चांगले काम केलेले आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल अ‍ॅड.संतोष पवार यांचे सर्वत्र स्वागत होत आहे.

No comments:

Post a Comment