तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 12 March 2019

लॉयन्स क्लब, पालम तर्फे मोफत मोतिबिंदु निदान व उपचार शिबीर.....

अरुणा शर्मा


पालम :- लॉयन्स क्लब,पालम व लॉयन्स आय हॉस्पिटल,नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने पालम येथे मोफत मोतिबिंदु निदान व मोफत ऑपरेशन शिबीर घेण्यात आले. या शिबिरात गरजू, गोरगरीब 248 स्त्री पुरूष रूग्णांची तपासणी करण्यात आली. त्या पैकी 95 रुग्णांना ऑपरेशनची गरज भासणार आहे. या सर्व रुग्णांना लॉयन्स क्लब पालम च्या वतीने प्रवास खर्चा सहित  लॉयन्स आय हॉस्पिटल नांदेड येथे मोफत ऑपरेशनसाठी पाठविले जात आहे.
शिबिराच्या उद्धघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लॉयन्स क्लबचे झोनल चेअरपर्सन मुंजाजी चोरघडे हे होते. तर उद्धघाटक डॉ.द्रोणाचार्य होते. तसेच  कार्यक्रमासाठी लॉयन्स क्लब पालमचे अध्यक्ष डॉ. बालाजी इप्पर, सचिव गुलाबराव रोकडे, सदस्य डॉ. अमोल शिंदे, लक्ष्मीकांत मालेवार, महेश टाक, झटिंग पाटील, दत्तराम शिंदे, विशाल नारलावर  यांच्यासह वैद्यकीय अधिकारी डॉ.विनायक वाखरडकर आणि  पत्रकार भरत जोगदंड व धोंडीराम कलंबे उपस्थित होते.
      रुग्णांची तपासणी डॉ.अमोल शिंदे यांच्या सर्वज्ञ हॉस्पिटल येथे लॉयन्स आय हॉस्पिटल, नांदेड चे नेत्र चिकित्सा सहाय्यक गजानन शेंडेराव यांनी केली. यापुढेही अनेक आरोग्यविषयक शिबिरे व ईतर सामजिक उपक्रम लॉयन्स क्लब पालम राबविणार असल्याचे डॉ.बालाजी इप्पर यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दत्ता वंजारे, शिवराम पौळ, सद्गुरु लिंगायत, शेख शकील, शुभम शिंदे, देवा गव्हाणे व विलास चांदणे यांनी सहकार्य केले.

1 comment: