तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 8 March 2019

सामाजीक कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्यामुळे तहसिलची मार्कींग पध्दत बंदकार्यालयीन कामासाठी येणार्‍या नागरीकांचा ञास वाचला

फुलचंद भगत(जिल्हा प्रतिनिधी)
मंगरुळपीर-येथील तहसिल कार्यालयामध्ये नागरीकांच्या तक्रारी,निवेदने पञे आदींवर तहसिलदार किंवा नायब तहसिलदारांची मार्कींग घेतल्याशिवाय ती पञे स्विकारल्या जात नसल्यामुळे ही पध्दत बंद करुन नागरीकांना होणारा ञास वाचवावा या मागणीसाठी सामाजीक कार्यकर्ते नंदलाल पवार आणी फुलचंद भगत यांनी ऊपविभागीय अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे मागणी केल्यानंतर ऊपविभागीय अधिकारी यांनी ही मार्कींग पद्धत बंद करन्याचे आदेश दिल्याने नागरीकांना होणारा ञास वाचला आहे.
             मंगरुळपीर येथील तहसिल कार्यालयामध्ये येणार्‍या लोकांच्या तक्रारी,निवेदने आदी पञावर आवक रजिष्टरमध्ये नोंद घेन्यापुर्वी तहसिलदार किंवा नायब तहसिलदार यांचेकडुन मार्कींग घेन्याची सक्ती करन्यात येत होती त्याशिवाय कुठलेही पञे स्विकारल्या जात नव्हते परंतु तहसिलदार,नायब तहसिलदार हे दौरे,सभा,मिटिंग यामध्ये बहूतांश व्यस्त राहत असल्याने नाकरिकांना त्यांच्या पञावर मार्कींग घेन्यास अडथळा येत होता परिणामी सदर पञे आवक रजिष्टरला स्विकारले जात नव्हते त्यामुळे लोकांना नाहक ञास होत होता.कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत होत्या यामुळे वेळेचा व पैशाचाही अपव्ययही होत होता.एका सहिसाठी तासनतास ताटकळत बसन्याची पाळी खेड्यापाड्यातुन आलेल्या नागरीकांवर  येत होती त्यामुळे यासंदर्भात वरिष्ठांनी गार्भीयांनी लक्ष देवून विविध पञासाठी मार्कींग पध्दत बंद करावी आणी लोकांना होत असलेला ञास वाचवावा अशा मागणीचे निवेदन सामाजीक कार्यकर्ते प्रा.नंदलाल पवार आणी फुलचंद भगत यांनी ऊपविभागिय अधिकार्‍यांना दिले होते.या निवेदनाची दखल घेवुन दि.६ मार्च रोजी नागरीकांची आलेली पञे सरळ आवक विभागात घेन्यात यावीत आणी दिवसातुन दोनदा आवक लिपीकाने अधिकार्‍यांचे मार्कींग घेवुन सबंधीस शाखेस तात्काळ ती पञे देन्यात यावे असे आदेश तहसिलदार यांना देवुन नागरीकांसाठीची मार्कींग पध्दत बंद केली आहे यामुळे होणारा लोकांचा ञास वाचला असुन वेळेचा आणी पैशाचा अपव्ययही टळला आहे.लोकहिताची मागणी नंदलाल पवार आणी फुलचंद भगत यांनी केल्याने आणी कर्तव्यदक्ष ऊपविभागीय अधिकार्‍यांनी ती मागणी तात्काळ पुर्ण केल्याने या निर्णयाचे नागरीकांकडुन समाधान व्यक्त केल्या जात आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835

No comments:

Post a Comment