तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 3 March 2019

मारुती गाडीने पेट घेतल्याने जळून खाक सेलू-परभणी रस्त्यावरील पिंपळगाव जवळ घडली घटना


 सेलू! प्रतिनिधी

 परभणीहून सेलू कडे येणाऱ्या मारुती८०० या गाडीने अचानक भेट घेतल्यामुळे गोगलगाव- पिंपळगाव दरम्यान घडलेल्या या घटनेत मारुती ८०० ही एम.एच.२२सी. २५०  गाडी जळून खाक झाल्याची घटना रविवार ३ मार्च रोजी दुपारी चारच्या सुमारास घडली. याबाबतची माहिती या प्रमाणे परभणी येथील गजानन बालासाहेब काटे आपल्या तीन सहकाऱ्यासह परभणीहून सेलूकडे येत असताना पिंपळगाव- गोगलगाव दरम्यान या मारुती गाडी च्या इंजिन मधून धूर येत असल्याचे लक्षात आले. गाडी थांबताच लगेच ज्वाला ही निघू लागल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गाडी मधील गजानन काटे यांनी सेलूच्या अग्निशामक दलास फोन केला. स्वच्छता विभागाचे दिलीप दौड यांना फोन येताच घटनेची माहिती त्यांनी   सेलू नगरपालिकेचे कार्यालयीन अधीक्षक सुदाम राठोड यांना माहिती देऊन अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी रवाना केली. तोपर्यंत संपूर्ण मारुती ८००ही गाडी जळून खाक झाली होती. शिवाय परिसरातील गवताने ही पेट घेतला होता.परंतु गाडीसह परिसरातील आग विझवल्यामुळे शेजारी असलेल्या कडब्याच्या गंज्या मात्र वाचल्या. अग्निशामक गाडीचे चालक सतिष अर्जूने, गणेश नवघरे, अंजीराम राऊत, बबलू पठाण, रवी अंबुरे,यांनी मारोती गाडीसह  परिसरात लागलेल्या आग अर्ध्या तासात आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला. पण मारुती८०० गाडी मात्र जळून खाक झाली.

No comments:

Post a Comment