तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 30 March 2019

बीडची लढाई आता जनता विरुद्ध भाजपा त्यांचे गुंड, पोलीस आणि प्रशासनासोबत- धनंजय मुंडे


सारिका सोनवणे वरील हल्ल्याचा केला तीव्र निषेध

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.30....... राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या पत्नीवर झालेल्या भ्याड हल्याचा विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी तिव्र शब्दात निषेध केला आहे. 

बीडची पोलीस यंत्रणा भाजपाच्या दावणीला बांधली असल्याचा पुर्नउच्चार करताना तुम्हाला बीडचा बिहार करायचा आहे का ? आम्हाला प्रचार ही करू द्यायचा नाही का ? असा जळजळीत सवाल केला आहे.

काल श्री.सोनवणे यांच्या पत्नी सौ.सारिकाताई सोनवणे यांच्यावर धर्माळा, ता.केज येथे गुंडांनी जीवघेणा हल्ला केला. 2 दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात पोलीसांसमक्ष काँग्रेस कार्यकर्ते दादासाहेब मुंडे यांना मारहाण करण्यात आली. 

जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था पुर्णपणे ढासळली आहे. जिल्ह्यात वारंवार अशा घटना घडत असताना भाजपच्या गुंडांची मात्र 10 मिनिटांत सुटका होते, सोशल मिडीयातून जनतेला उघड-उघड धमक्या दिल्या जात असताना पोलीस यंत्रणा सत्ताधार्‍यांच्या दावणीला बांधल्या सारखी काम करीत आहे, कदाचित पोलीसांना बीडचा बिहार करायचा आहे का ? आम्हाला प्रचारही करू द्यायचा नाही  असे वाटते आहे. 

पोलीस आणि प्रशासनाला अशाच पध्दतीने सत्ताधार्‍यांच्या मर्जीने काम करायचे असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस च्या कार्यकर्त्यांनी आता आपली निवडणुक ही बीडची जनता विरूध्द सत्ताधारी भाजपा त्यांचे गुंड, पोलीस आणि प्रशासन अशी असेल, असे समजुन लढाईसाठी सज्ज व्हावे असे आवाहन श्री.मुंडे यांनी केले आहे. 

या प्रकरणी आपण निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार असून, सत्ताधार्‍यांनी कितीही पोलीस आणि सत्तेचा गैरवापर केला तरी, त्यांच्या गुंडगिरी विरूध्द लोकशाही मार्गाने लढा देऊन विजय प्राप्त करू असा विश्वास व्यक्त केला आहे.

No comments:

Post a comment