तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 3 March 2019

ग्रामविकास विभागात मेगाभरती पंकजा मुंडेंची मोठी घोषणा


बाळू राऊत मुंबई जिल्हा प्रतिनिधी
मुंबई : दि.०३ आपल्या देशात सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे बेरोजगारीचा मुद्दा ग्रामविकास विभागाने घेतलेल्या एका निर्णयामुळे सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी आता सुवर्ण संधी मिळाली आहे हजारो तरुणांना नोकरी मिळणार आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी यासंदर्भात निर्णय घेतला आहे.
ग्रामविकास विभागाने एकूण १३ हजार ५१४ जागांवर तरूणांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. सर्व पदांची भरती व त्याचे आरक्षण शासन नियमानुसार होणार असून तशी जाहिरात प्रत्येक जिल्हा परिषदेकडून वर्तमानपत्रात प्रसिद्ध होण्यास सुरवात होणार आहे.ही मेगा भरती राज्यातील सहाही विभागात होणार आहे पुणे विभागात सर्वाधिक 2 हजार 721, औरंगाबाद विभागात 2 हजार 718, नाशिक विभागात 2 हजार 574, कोकण विभागात 2 हजार 51, नागपूरमध्ये 1 हजार 726 तर अमरावती विभागात 1 हजार 724 जागा आहेत
*खालील पदाची भरती होणार आहे*
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य, विद्युत, यांत्रिकी), विस्तार अधिकारी (पंचायत, कृषी, सांख्यिकी), ग्रामसेवक (कंत्राटी), आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवक (पुरूष 50 टक्के), आरोग्य सेवक (पुरूष 40 टक्के), आरोग्य सेविका, स्थापत्य अभियंता (सहायक), पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ सहायक (लेखा, लिपीक), अंगणवाडी पर्यवेक्षिका, कनिष्ठ सहायक (लिपीक), कनिष्ठ लेखा अधिकारी आणि कनिष्ठ यांत्रिकी या पदांसाठी ही भरती होणार आहे.

No comments:

Post a Comment