तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 8 March 2019

विविध मागण्यां साठी महिलांचे सत्याग्रह आंदोलन;दुष्काळ निवारण संघर्ष समितीचा पुढाकार.
प्रतिनिधी
सोनपेठ:-जिल्हातील सोनपेठ येथे  08 मार्च महिला दिनी रोजगार रेशन पिक विमा आणि दुष्काळी उपाययोजनांच्या हक्कासाठी सोनपेठ तहसील कार्यावयावर दुपारी 1 वाजता शहरात फेरी करत सत्याग्रह आंदोलन करण्यात आले .
           या वर्षी जिल्हात भिषण दुष्काळ आहे , सोनपेठ तालुक्यात भिषण पाणी टंचाई आहे. पिक विम्या संदर्भात पिक  कापणी प्रयोगात घोटाळेबाज पद्धतीने कापणी प्रयोगाचे निष्कर्ष चुकीचे काढण्यात आले असल्याचे आंदोलकांचे आरोप आहेत यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना कोणताही विमा देण्यात येत नाहीय.
 सोनपेठ शहरामध्ये रोहयो काम तात्काळ सुरू करुन
 सोयाबीन विम्यासह खरीप 2018 पिक विमा द्यावा.निराधारांचे त्रुटी मधील असलेले अर्ज तात्काळ निकाली काढावेत.
 तालुक्यात तात्काळ चारा छावण्या सुरू कराव्यात यासह
सोनपेठ येथे ग्रामीण रुग्णालय सुरू कराव व
माजलगाव प्रकल्पातून सोनपेठ तालुक्यसाठी पाणी तातडीने पाणी वाटप करा  आंदोलक महिला व संघर्ष समितीने यावेळी सत्याग्रहाद्वारे  मागण्या लेखी निवेदनाद्वारे तहसीलदार यांना दिल्या आहेत . यावेळी
काँ. राजन क्षिरसागर ,         शिवाजी कदम,मुरली पायघन,
  माणिकराव कदम,  यांनी आंदोलकांना मार्गदर्शन केल. 

  
 शेतमजूर ,शेतकरी, कामगार महिलांची  मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment