तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 7 March 2019

अभिनव विद्यालयाच्या वतीने कर्तृत्ववान स्त्रियांचा गौरव सोहळ्याचे आयोजन


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : -
   ज्ञानप्रबोधिनी विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अभिनव प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येथे संस्थेचे सचिव परळी भूषण साहेबराव फड यांच्या पुढाकाराने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून परळी तालुक्यातील कर्तृत्ववान स्त्रियांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे या सोहळ्यात परळी तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक, राजनैतिक, वैद्यकीय, प्रशासकीय सह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्याऱ्या कर्तृत्ववान स्त्रियांचा गौरव करण्यात येणार आहे. मागील तीन वर्षांपासून संस्थेचे सचिव परळी भूषण साहेबराव फड यांच्या पुढाकाराने महिला दिनाचे औचित्य साधून ८ मार्चरोजी शाळेत मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पाडण्यात येत असून सार्वजनिक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने आजच्या महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रस्थानी दिसून येत आहे अशा महिलांना प्रोत्साहित करुन त्यांच्या कार्याचा सन्मान करून सावित्रीच्या लेकीनचा गौरव करून त्यांच्या कामाची पावती दिली पाहिजे या उद्देशाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती संस्थेच्या उपाध्यक्षा सौ गयाबाई साहेबराव फड यांनी दिली या सोहळ्याला सर्व आमंत्रित कर्तृत्ववान महिलांनी उपस्थित राहावे असे आवाहन अभिनव विद्यालय परिवार कडून करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment