तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 12 March 2019

यशवंतराव चव्हाण हे एक सहृय राजकीय नेते होते. ______ प्रा. डाॅ. सुधाकर जाधवपरतूर ____  यशवंतराव चव्हाण हे एक सहृय राजकीय नेते होते, द्वेषमूलक राजकारण त्यांनी कधीच केले नाही. असे प्रतिपादन प्रा .डाॅ . सुधाकर जाधव यांनी केले. ते लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात  स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रबंधक दशरथ देवडे हे होते. 
      आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले की , आजचे राजकारणी हे द्वेष आणि हिसेंला प्रोत्साहन देणारे राजकारण करताना दिसतात त्यामुळे देशातील लोकशाही व्यवस्था धोक्यात आली आहे. राजकीय क्षेत्र एक पवित्र आणि समाज सेवेचे क्षेत्र आहे. परंतु आज केवळ पैसा कमिवण्यासाठी राजकारण केले जाते. यशवंतराव राजकारणाला समाज सेवेचे साधन मानत होते . गांधीवादी समाजवाद हे त्यांच्या कामाचे सूत्र होते. आधुनिक महाराष्ट्राचे एक शिल्पकार म्हणून सारा देश त्यांना ओळखतो. बेरजेचे राजकारण करणारा नेता म्हणून त्यांची ख्याती होती. कल्याणकारी लोकशाही व्यवस्था कशी असते ते त्यांनी आपल्या धोरणातून आणि कृतीतून दाखवून दिले . पंचायत राज्यव्यवस्थेचा प्रयोग पहिल्यांदा महाराष्ट्रात त्यांनीच  राबविला आणि सा-या देशात ती व्यवस्था पुढे राबविण्यात आली. त्या पाठीमागे सत्तेच्या विकेंद्रीकरणाचे तत्व होते. एक सुसंस्कृत आणि प्रतिभावंत नेतृत्व यशवंतरावजीच्या रूपाने महाराष्ट्राला लाभले होते.असेही ते शेवटी म्हणाले. 
 याप्रसंगी व्यासपीठावर उपप्राचार्य संभाजी तिडके, प्रा. डाॅ. मिलिंद खरात,उप प्राचार्य एस एस मुळे, उपप्राचार्य डाॅ.रवी प्रधान , डाॅ. राजेंद्र फासे, प्रा. डाॅ. दिनकर टकले,डाॅ. वैशाली चौधरी, प्रभाकर सुरुंग , शरद पतंगे आदी मंडळी उपस्थित होती.

No comments:

Post a Comment