तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 5 March 2019

तहसिलदार यांच्या आदेशाला तलाठी भगत कडून केराची टोपली आलेवाडी ग्रामस्थ तलाठी विनाच


संग्रामपुर [ प्रतिनिधी] सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या  तालुक्यातील बहुल आदीवासी गाव यागावाची लोकसंख्या साडेचार हजार असुन गावात बहुताश शेतकरी शेतमजुरांची संख्या मोठ्या प्रमाणात असतांना  आलेवाडी ,चिचारी,सायखेड, लाडनापुर,टुनकी शिवारात शेती असल्याने आलेवाडी येथील शेतकरी शेतमजुर पालकांना तलाठी कार्यालय संबंधीत सात बारा उत्पन्न दाखला व आपल्या व्यक्तिक कामानिमित्त तारेवरची कसरत करित वसाळी , लाडणापुर, सोनाळा तलाठी कार्यालय ये जा करावी लागत असल्याने स्वतंत्र शेतकरी कामगार संघटना जिल्हा उपाध्यक्ष भिकन केदार यांनी तहसिलदार पवार यांना शेतकरी शेतमजुरांच्या सुविधेसाठी आलेवाडी गावात तलाठी १ दिवस देण्यात यावे अशी मांगणी निवेदनव्दारे केली होती कर्तव्यदक्ष तहसिलदार पवार यांनी तलाठी ए एस भगत यास आपल्या हलक्यातील प्रत्येक गावात भेट देऊन त्यागावातील  शेतकरी शेतमजुरांच्या अडी अडचणी समस्या सोडविण्यात याव्या  आलेवाडी गावाची लोकसंख्या जास्त असल्याने तलाठी कार्यालय संबंधीत शेतकऱ्यांना आवश्यक असलेले दाखले प्रमाणपत्र वेळेवर मिळावे म्हणुन आलेवाडी गावात आठवड्यातुन १ दिवस उपस्थीत राहण्या बाबतचे आदेश तहसिलदार पवार यांनी तलाठी भगत यास देऊन १ महिणा उलटला परंतु तहसिलदार यांच्या आदेशाला संबंधीत तलाठीने केराची टोपली दाखवत मनमानी पणाचा कळस गाठल  आलेवाडी गावाला आदेशा प्रमाणे भेट दिली नसल्याने शेतकरी शेतमजुर आवश्यक असणारे दाखले प्रमाणपत्र वेळेवर मिळत नसल्याची ओरड होत असुन शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होणार नाही व आपल्या कर्तव्यात कसुर होणार नाही असे स्पष्ट आदेश तहसिलदार यांचे असतांना १ महिणा होवुनही तलाठी भगत यांनी तहसिलदार यांच्या आदेशाचे पालन केले नसल्याने नियमाची एैसी तैसी करणाऱ्या संबंधीत तलाठीवर कारवाई करण्यात यावी व शेतकऱ्यांना आश्यक दाखले व प्रमाणपत्र वेळेवर मिळावे व होणारी गैरसोय टाळण्यासाठी आलेवाडी येथे १ दिवस तलाठी नियुक्ती साठी तहसिलदार पवार यांनी जातीने लक्ष दयावे अशी मांगणी स्वातंत्र कामगार शेतमजुर संघटना जिल्हा उपाध्यक्ष भिकन केदार सह आलेवाडी ग्रामस्थानी केली आहे

No comments:

Post a Comment