तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 30 March 2019

पाथरी विधानसभा मतदार संघातील कार्यालयीन प्रमुखांची उपविभागिय अधिकारी यांच्या अध्यक्षते खाली बैठक संपन्न


प्रतिनिधी
पाथरी:-परभणी लोकसभा मतदार संघाचे निवडणुक निरिक्षक यांच्या अध्यक्षते खाली परभणी येथील जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात २८ मार्च रोजी  आयोजित केलेल्या बैठकीतील सुचनांची माहिती देण्या साठी शनिवार ३० मार्च रोजी पाथरी येथील तहसिल कार्यालयात उपविभागिय अधिकारी तथा सहायक निवडणुा निर्णय अधिकारी  ९८-पाथरी विधानसभा  मतदार संघ व्हि एल कोळी यांच्या अध्यक्षते खाली येथिल तहसिल कार्यालयात पाथरी,मानवत,परभणी,सोनपेठ येथिल विभाग प्रमुख/अधिकारी  यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकी साठी पाथरी च्या तहसिलदार भाग्यश्री देशमुख, मानवत चे तहसिलदार डी डी फुपाटे, सोनपेठचे तहसिलदार आशिषकुमार बिरादार, सेलूचे उपविभागिय पोलीस अधिकारी पाथरीचे गटविकास अधिकारी बालासाहेब बायस, मानवत चे ज्ञानप्रकाश घुगे, पाथरी न प चे मुख्याधिकारी कारभारी दिवेकर, मानवतचे उमेश ढाकणे ,सोनपेठचे मुख्याधिकारी देविदास जाधव, पाथरीचे पोलिस निरीक्षक दिपक शिंदे, मानवतचे रमेश स्वामी, मानवतचे एकात्मिक बालविकास अधिकारी एस जी गडदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ के पी चौधरी, डॉ ए बी रावरेकर, डॉ एस एन वाघ, डॉ बी आर टेंगसे, डॉ दगडू, डॉ एस पी पवार, डॉ एस पी देशमुख,मरा वि म कंपनी उपविभागिय उपकार्यकारी अभियंता व्हि एम मठपती, सार्वजनिक बांधकाम उपविभाग पाथरीच्या उपविभागिय अभियंत्या एम व्ही मुदिराज, गट शिक्षणाधिकारी प्रतिनिधी जी एस कोटलवार , एम बी गायकवाड, व्हि व्हि घोगरे, एस पी किटे, पी एम तांबोळी यांची या वेळी उपस्थिती होती.या वेळी सोनपेठ चे तहसिलदार आशिषकुमार बिरादार यांनी सर्व विभाग प्रमुख अधिकारी यांचे स्वागत करून २८ मार्च रोजी परभणी येथील बैठकीत निवडणुक निरिक्षकांनी सहायक निवडणुक विषयक सुचनां ची माहिती ची पुर्तता करण्या बाबत आयोजित केल्याचे सांगुन निवडणुकी संदर्भात करावयाच्या कामा बाबत विभाग निहाय आढावा घेण्यात आला.

No comments:

Post a comment