तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 18 March 2019

जिंतूर तालुक्यात हरिनाम सप्ताहातून मतदान जागृती EVM/VAPAT चे प्रात्यक्षिकजिंतूर
निवळी बु  ता. जिंतुर येथे हरिनाम सप्ताहात EVM /VVPAT जनजागृती -
जिंतुर तालुक्यात EVM /VVPAT जनजागृती मोहीमेचा दुसरा टप्पा मा. जिल्हाधिकारी श्री   पी. शिवाशंकर, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्री उमाकांत पारधी, श्री महादेव किरवले उप. जिल्हाधिकारी निवडणूक परभणी, जिंतुरचे तहसिलदार श्री सुरेश शेजूळ यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. 
आज निवळी बु येथे अखंड हरिनाम सप्ताहात EVM व VVPAT जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. 
या कार्यक्रमाला उपस्थित भाविक भक्तांचा चांगला प्रतिसाद मिळाला .त्यांनी प्रत्यक्ष मतदानाचे प्रात्यक्षिक करून मतदानाची खात्री करून घेतली व मतदानाच्या पारदर्शकतेबाबत समाधान व्यक्त केले. ४५ भाविक भक्तांनी प्रत्यक्षात मतदान करून मतदानाची खात्री केली. 
या जनजागृती पथकांमध्ये सोपान  खताळ, अशोक मुलगीर, गणेश ठिगळ ,फोटो ग्राफार ओम वर्मा ,शस्त्रधारी पोलिस कर्मचारी राम पौळ यांचा समावेश आहे. 
जिंतुर तालुक्यात प्रभावी पणे  जनजागृती या पथकामार्फत चालू आहे. 
आता पर्यंत या पथकाने उत्कृष्ट जनजागृतीचे काम गावोगावी जाऊन केले आहे.

No comments:

Post a Comment