तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 11 March 2019

ISO 9001 -2015 मानांकन मिळविणारे शिवसेनेचे राहुल शेवाळे ठरले देशातले पहिले खासदार


बाळू राऊत मुंबई जिल्हा प्रतिनिधी 
मुंबई दि.११ दक्षिण-मध्य मुंबईचे शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांना ISO मानांकन मिळाल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यानींही राहुल शेवाळे यांचे कौतुक केलं. ISO 9001 -2015 मानांकन मिळवणारे देशातले पहिले शिवसेना खासदार म्हणून राहुल शेवाळे ठरले आहेत प्रभावी आणि जलद तक्रार-निवारण व्यवस्थापन, लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी डिजिटल पद्धतीचा अवलंब आणि सरकारी योजनांविषयीची प्रभावी जनजागृती या बाबींसाठी खासदार श्री.राहुलजी शेवाळे यांच्या चेंबूर येथील जनसंपर्क कार्यालयाला ISO 9001 -2015 मानांकन प्राप्त झाले आहे. 
पाच वर्षांत केलेल्या विविध समाजोपयोगी कामांचा आढावा घेणाऱया कार्यअहवालाचे रविवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ई-प्रकाशन झाले. खासदार किती उत्कृष्टरित्या काम करू शकतो यांचं उत्तम उदाहरण असलेले खासदार राहुल शेवाळे येत्या 5 वर्षात चौपट काम करतील” अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी शेवाळे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.कार्यअहवाल सोहळय़ाला शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, खासदार अनिल देसाई, शिवसेना नेते आनंदराव अडसूळ, शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, आमदार सदा सरवणकर, आमदार तुकाराम काते, विभागप्रमुख मंगेश सातमकर, माजी महापौर श्रद्धा जाधव, विभाग संघटक रिता वाघ, माजी नगरसेविका कामिनी शेवाळे उपस्थित होते.
पक्षाच्या बांधणीत आणि जडण-घडणीत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या शिवसेना गटप्रमुखांसाठी, खासदार राहुल शेवाळे यांनी मोफत विमा उतरविला आहे. यामुळे गटप्रमुखांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

No comments:

Post a Comment