तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 7 March 2019

सृजनत्वाच्या सृजन करांना विनयाचे हे वंदन गे l नूतन विद्यालयात महिला दिनानिमित्त कार्यक्रम


प्रतिनिधी
सेलू:-" सृजनत्वाच्या सृजन करांना
विनयाचे हे वंदन गे l
दातृत्वाच्या मातृत्वाला
कृतज्ञतेचे वंदन हे ll " 
जागतिक महिला दिनानिमित्त नूतन विद्यालयातील फलकावर  उमटलेल्या काव्यपंक्तींनी
समस्त महिलावर्गा विषयी कृतज्ञता, विनयाच्या प्रगटलेल्या भावांनी सर्वांचेच लक्ष वेधले.
शाळेत शुक्रवारी जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अनिल कुलकर्णी तर प्रमुख पाहुण्या कांचन बाहेती, डॉ.कल्पना कुलकर्णी उपस्थित होत्या. उपमुख्याध्यापक अशोक गाजरे, पर्यवेक्षक मा.मा.सुर्वे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. यावेळी महिला शिक्षिका व विद्यार्थीनींचा सत्कार करण्यात आला.
सहशिक्षक अशोक लिंबेकर हे प्रसंगानुरूप फलखलेखनाव्दारे काव्यलेखनातून त्या-त्या प्रसंगातील भाव व्यक्त करत असतात.
" सोशिक ऐशा कर्तृत्वाचे
दारावरती तोरण गे l
मांगल्याच्या घरासाठी
मांगल्याचे अंगण हे ll 
असे सांगत महिलांमुळे घराघरांत 
सदैव प्रसन्नता आणि मांगल्य नांदत असते.
"घराघरातील बहरतात झाडे
त्या माऊलीचे हे वंदन गेl
वृक्षराजींची साउली
त्या साउलीला वंदन हे ll"
अशी ही माय माऊली सर्वांना पाठबळ देत नित्य वंदनीय असल्याची भावना श्री.लिंंबेकरांच्या काव्यातून व्यक्त झाली. सांस्कृतिक विभाग प्रमुख संतोष पाटील, काशिनाथ पल्लेवाड यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

No comments:

Post a Comment