तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 15 April 2019

मुंबईत मोठ्या उत्सवात पार पडली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 128 वी जयंती


बाळू राऊत मुंबई जिल्हा प्रतिनिधी 
मुंबई :जग बदल घालुनी घाव,सांगून गेले मला भीमराव...
राज्या राणीच्या जोडीला सात मजली माडीला आहे कोणाचे योगदान लाल दिव्याच्या गाडीला...... अश्या गाण्यांनी आसमंत न्हाऊन निघाला होता. 
विश्वरत्न ,युगप्रवर्तक ,प्रज्ञासूर्य ,क्रांतिसुर्य, ज्ञानाचा अथांग सागर बोधिसत्व व भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 128 वी जयंती मोठ्या थाटामाटात पार पडली .गल्लोगल्ली, चौकात आणि रस्त्यावर बाबासाहेबांच्या नावाचा जयजयकारचा आवाज घुमत होता. काही ठिकाणी मिरवणुका ही निघाल्या होत्या. काही ठिकाणी रक्तदान शिबिरे तसेच रुग्णांना फळे वाटप तर काही ठिकाणी पुस्तके वाटप करण्यात आले. काही ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य हे आदर्शवत असुन सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. समाजाच्या तळागाळातील माणसाचा विकास होण्यासाठी,  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर संघर्ष केला बाबासाहेबांचे कार्य हे सर्व समाजासाठी होते. या देशातील करोडो बहुजनांच्या आयुष्याचे सोने मात्र विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने झाले
*परिचय*
नाव:डॉ. भिमराव रामजी आंबेडकर
जन्म14 एप्रील 1891
जन्मस्थान महू, इंदौर मध्यप्रदेश
वडिल
रामजी मालोजी सकपाळ
आई भीमाबाई मुबारदकर
पत्नी:पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935) 
दुसरी पत्नी: सविता आंबेडकर (1948.1956)
शिक्षण:एलफिन्सटन हायस्कुल, बाॅम्बे विश्वविद्यालय
1915 एम.ए. (अर्थशास्त्र)
1916 मध्ये कोलंबिया विश्वविद्यालयातुन PHD
1921 मधे मास्टर आॅफ सायन्स
1923 मध्ये डाॅक्टर आॅफ सायन्स
मृत्यु:6 डिसेंबर 1956
जागतिक दर्जाचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ, कायदेपंडीत, राजनीतिज्ञ, लेखक, समाज सुधारक, तत्त्वज्ञ, भारतीय संविधानाचे शिल्पकार, मानवी हक्कांचे कैवारी, भारताचे पहिले कायदा व न्यायमंत्री, आणि स्वातंत्र भारताचे जनक होते. याशिवाय बहुआयामी असलेले डॉ. आंबेडकर हे समाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, बॅरिस्टर, जलतज्ज्ञ, कृषितज्ज्ञ, संपादक, स्वातंत्र्य सेनानी, अस्पृश्य, कामगार व स्त्रियांच्या अधिकारांचे पुरस्कर्ते होते.
 *कोणी आणि कशी सुरू केली भीम जयंती*  
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची यंदा 128वी जयंती साजरी केली जात आहे. 
पहिली आंबेडकर जयंती 1928 साली जनार्दन सदाशिव रणपिसे या सामाजिक कार्यकत्याने पुणे येथे साजरी केली. 
 त्यावेळेस बाबासाहेबांच्या प्रतिमेची रथातून आणि उंटावरून मिरवणूक काढण्यात आली होती. यामुळे समाजात शोषित घटकांना अन्यायाविरूद्ध आवाज उठवण्याची, एकत्र ये ऊन संघटीत होण्याची प्रेरणा मिळाली. हळूहळू भीम जयंतीचा सोहळा गावातून सुरू होऊन शहरात आणि आज परदेशात पोहचला आहे.2017 सालापासून महाराष्ट्रामध्ये 14 एप्रिल हा दिवस ‘ज्ञान दिन’ म्हणून साजरा केला जातो.
लंडनमधील सन्मान
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पोलीटिकल सायन्समध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धपुतळा स्थापला गेला आहे. आणि त्याठिकाणी पुतळा असणारे ते प्रथम भारतीय आहेत.
इ.स. २०१४ साली कोलंबिया विद्यापीठाने आपल्या विद्यापीठात शिकलेल्या एकूण विद्यार्थांमधून पहिल्या १०० बुद्धिमान विद्यार्थ्यांच्या यादीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वात बुद्धिमान विद्यार्थी (फर्स्ट कोलंबियन अहेड ऑफ देअर टाइम) म्हणून घोषित केले आहे.
*डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार*
लोकशाहीचे दोन शत्रू म्हणजे 'हुकूमशाही' आणि माणसां-माणसांत भेद मानणारी 'संस्कृती'
मी नदीच्या प्रवाहालाच वळवणाऱ्या भक्कम खडकासारख आहे उगवत्या सूर्याला नमस्कार करतांना मावळत्या चंद्राला विसरू नका.
माणूस हा धर्माकरिता नाही तर धर्म हा माणसाकरिता आहे.पावलागणिक स्वत:च्या ज्ञानात भर टाकित जाणे यापेक्षा अधिक सुख दुसरे काय असू शकते.
भारतात अनेक जाती अस्तित्वात आहेत. या जाती देशविघातक आहेत. कारण त्या सामाजिक जीवनात तुटकपणा निर्माण करतात.
अन्यायाविरूद्ध लढणाच्या ताकद आपल्यात येण्यासाठी आपण स्वाभीमानी व स्वावलंबी बनलं पाहिजे शिक्षण ही पवित्र संस्था आहे. शाळेत मने सुसंस्कृत होतात. शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे.
जगामध्ये स्वाभिमानाने जगायला शिका. या जगात काहितरी करून दाखवायचे आहे. अशी महत्तवकांक्षा सदैव तुमच्याकडे असली पाहिजे. लक्षात ठेवा, जे संघर्ष करतात तेच यशस्वी होतात.

No comments:

Post a Comment