तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 16 April 2019

हिवरखेडा येथे चक्रीवादळा मुळे 15/ ते 20 जणांच्या घरावरील टीन पत्रे उडाली
साखरा प्रतिनिधि शिवशंकर निरगुडे 


सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा येथे दि 16/5/ ला संध्याकाळी 7 वाजता चक्रीवादळा मुळे 15/ते 20 जणांच्या घरावरील टीन पत्रे उडाली व गावामधील मोठ मोठ झाडे पडली घरावरील पत्रे ऊडाल्या मुळे अनेक जणांच्या घरात पाणी संाचले  अनेक जणांच्या घरातील संसार उपयोगी साहित्य भिजले काही जणांचे गहू पिजले व तसेच बऱ्याच जणांच्या कोठ्यावरील टीन पत्रे उडाली व काही जणांचे गुरे पत्राखाली  दबली होती वारे कमी  की गावातील नागरिकांनी गुरे बैल गाई   बाहेर काढल्या त्यामुळे काही जनावरेही जखमी जाले आहेत व तसेच विद्युत तारे देखील तुटली व विद्युत खांब पण पडला रात्री 9 वाजता पूर्ण पणे वारे व पाऊस बंद जाला गावातील नागरीक आप आपली टीन पत्रे शोधायला धाव पळ करीत होती
व गावातील आंब्याचे फार मोठे नुकसान जाले राम देसाई यांच्या शेतात चार आंब्याचे झाडे होती यांच्या आंब्याचे पूर्ण पणे आंबे खाली पडले अंदाजे 20 हजार रुपयाचे नुकसान जाले आहे संबंधीत विभागाने या भागातील सर्वे करून शेतकऱ्यांची नुकसान भरपाई करून द्यावी अशी मागणी या भागातील नागरीक करीत आहे 

तेज न्यूज़ हेड लाइन्स ऑनलाइन वेब वाहिनी 

साखरा प्रतिनिधि शिवशंकर निरगुडे

No comments:

Post a Comment