तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 16 April 2019

मतदार जाग्रुती प्रचार फेरी.... 160 कांदिवली विधानसभा मतदार संघ sveep अंतर्गत मतदार जाग्रुती फेरीचे आयोजन..शांताराम मगर प्रतिनिधी वैजापुर
 करण्यात आले होते.
‘लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे असून, युवकांनी लोकशाही विचारांचे प्रचारक-प्रसारक बनावे, लोकशाहीमध्ये केवळ हक्काला महत्त्व देऊन चालणार नाही. तर जबाबदारीला महत्त्व आहे. लोकशाहीमध्ये जबाबदार नागरिक म्हणून देशाचे कायदे, नियम, शिस्त यांचे पालन केले पाहिजे. लोकशाही प्रणालीत निवडणूक आणि मतदान ही संधी आहे. निवडणूक प्रक्रियेत मतदान करून प्रत्येकाने स्वंयस्फूर्तीने सकारात्मक योगदान दिले पाहिजे. प्रत्येकाच्या जीवनात लोकशाहीच्या फायद्याचा प्रकाश निर्माण करावयाचा आहे. त्यासाठी लोकशाही सुदृढ आणि बळकट झाली पाहिजे, यासाठी मतदारांनी लोकशाही विचारांचे प्रचारक-प्रसारक बनावे’, असे आवाहन निवडणूक निर्णय आधिकारी उध्दव  घुगे यांनी केले. देश, धर्म, प्रांत, भाषा या बाबतीत भिन्न असला तरी लोकशाही विचारप्रणालीमुळे एकसंघ आहे रॅली निमित्त आयोजित केलेल्या उपक्रमांची माहिती दिली.
राष्ट्रीय मतदार जनजागृती रॅलीच्या वेळी सय्यक निवडणूक आधिकारी डाॅ.विलास नाईक तहसीलदार दत्तारामदास कोकडे नायब तहसीलदार रुपेश पावले sheep चे नोडल आधिकारी श्री पाटणे यांच्यासह BMCचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment