तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 17 April 2019

लोकसभेसाठी परळी विधानसभा मतदार संघात 1698 कर्मचार्‍यांची नियुक्ती, तगडा पोलिस बंदोबस्त, 17 केंद्र संवेदनशील
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- बीड लोकसभेसाठी आज दि.18 एप्रिल रोजी मतदान होत असुन परळी विधानसभा मतदार क्षेत्रात मतदान सुरळीत पणे पार पडावे यासाठी प्रशासकीय यंत्रणेची जय्यत तयारी झाली असुन परळी मतदार संघातील एकुण 339 मतदान केंद्रावर 1698 कर्मचारी व अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली असुन या मतदान केंद्रावर पोलिस उपअधिक्षक सुरेश गायकवाड यांच्यासह 22 अधिकारी, 199 होमगार्ड, 50 आरपीएफ तुकडी, 3 सीआयएसपी तुकडी असा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असुन परळी विधानसभा मतदार संघात 17 मतदान केंद्र संवेदनशील म्हणून जाहिर करण्यात आले आहेत. या मतदान केंद्रावर वाढीव पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. 
बीड लोकसभा मतदार संघासाठी आज मतदान होत आहे. परळी विधानसभा मतदार संघात एकुण 335 मतदान केंद्र व 4 सहाय्यक मतदान केंद्र आहेत. यापैकी परळी तालुक्यात 239 तर अंबाजेागाई तालुक्यात 100 मतदान केंद्र आहेत. या एकुण 339 मतदान केंद्रावर 304034 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. आज परळी तहसील कार्यालयात मतदान केंद्र निहाय मतदान यंत्राचे वितरण करण्यात आले. यावेळी परळी तहसील कार्यालयात सकाळ पासुनच नियुक्त केलेल्या कर्मचारी व अधिकार्‍यांची मोठी गर्दी होती. तहसील प्रशासनाकडुन मतदान प्रक्रियेसाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे. सर्व मतदान केद्रांवर सुविधा तात्काळ उपलब्ध व्हावी यासाठी वाहनांची सोय करण्यात आली आहे. यामध्ये मतदान प्रक्रिया शंाततेत, व सुरळीत पार पाडावी यासाठी फिरते पथक असणार आहे. तसेच कांही बिघाड झाल्यास तात्काळ मतदान केंद्रावर पाहोचता यावे यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला असून मतदान यंत्राच्या वाहनांसोबत हत्यारबंद सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. 
******

परळीत 17 केंद्र संवेदनशील
निवडणुक आयोगाच्या निकषांनुसार ज्या मतदान केंद्रात 90 % पेक्षा जास्त मतदानाची टक्केवारी आहे व एकाच उमेदवाराला 75% पेक्षा जास्त मते मिळाली आहेत ती मतदान केंद्रे संवेदनशील म्हणुन घोषीत करण्यात आली आहेत यात परळी  तालुक्यातील 17 मतदान केंद्र संवेदनशील असल्याने या 17 मतदान केंद्रावर वाढीव पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment