तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 15 April 2019

तळेगाव येथे 19 एप्रिलरोजी हनुमान जयंती निमित्त भव्य कुस्ती स्पर्धाआयोजन

विजेत्या मल्लास भगवानबाबा केसरी किताब (गदा) देण्यात येणार


मल्लांनी कुस्ती स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे-पै.मुरलीधर मुंडेपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- मौजे तळेगाव ता. परळीच्या वतीने श्री हनुमान जयंतीनिमित्त
जयहिंद युवक व्यायाम शाळा व क्रीडा मंडळा तसेच श्री संत भगवानबाबा व्यायाम शाळाच्या वतीने प्रतीवर्षा प्रमाणे याही वर्षी वतीने भव्य महिला व पुरुष कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्या मल्लास भगवानबाबा केसरी किताब (गदा) देणार आहेत. या स्पर्धेमध्ये विविध ठिकाणच्या मल्ल (पहेलवान) यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजक तथा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे तालुकाध्यक्ष पै.मुरलीधर भागवतराव मुंडे यांनी केले आहे. 

   
      श्री हनुमान जयंती निमित्त शुक्रवार दि.19 एप्रिल 2019 रोजी दुपारी 2 वाजता तळेगाव येथील श्री संत भगवानबाबा व्यायाम शाळा मैदान  या ठिकाणी भव्य महिला व पुरुष कुस्ती दंगल होणार आहेत. गेल्या सहा वर्षापासुन श्री हनुमान जयंती निमित्त घेण्यात येणार्‍या कुस्त्यांना महाराष्ट्रातील तसेच बीड जिल्ह्यातील नामवंत मल्ल उपस्थित राहतात. या वर्षीही मोठ्या प्रमाणावर कुस्त्या होणार असुन, विविध ठिकाणच्या मल्लांनी तसेच हनुमान भक्तांनी या कुस्त्यांस सहभागी व्हावे तसेच कुस्ती पाहण्यासाठी कुस्तीगीर, कुस्तीप्रेमी व क्रिडाप्रेमीनी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे परळी तालुकाध्यक्ष पै.मुरलीधर मुंडे सह समस्त तळेगाव गावकरी मित्र मंडळ यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment