तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 30 April 2019

डॉ.संतोष मुंडे यांच्या प्रयत्नातून 25 अपंगांना प्रत्येकी 5,000 रूपयांचा पहिला हप्ता काँम्पयुटर प्रशिक्षणासाठी खात्यात वर्ग
महादेव गित्ते
------------------------
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  संगणक हा बहुतांश व्यक्तींच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. संगणकाशिवाय काम करणे ही कल्पनाही आता अनेकांना स्पर्शू शकत नाही. इतके संगणकाचे मानवी जीवनातील महत्त्व वाढले आहे. या संगणकाचा वापर नेमका कसा करावा याबाबत पुरेसे ज्ञान नसल्यास ही सुविधा ऐनवेळी गैरसोयीची ठरते. म्हणून प्रत्येक अपंगानी बाधवांनी काँम्पयुटरचे प्रशिक्षण घेणे काळाची गरज बनली असल्याचे असे प्रतिपादन अपंगाचे कैवारी डॉ. संतोष मुंडे यांनी  मार्क 1 काँम्पयुर्स प्रमाणपत्र व शिष्यवृत्ती वाटप योजना सोहळ्यामध्ये बोलतांना केले. 

    शहरातील पंचशील नगर भागातील आज दि.30 एप्रिल रोजी अपंगाचे कैवारी डॉ. संतोष मुंडे यांच्या प्रयत्नातुन व मार्क 1 काँम्पयुर्स परळी वैजनाथ यांच्या संयुक्त विद्यमाने 25 अपंग विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व शिष्यवृत्ती वाटप योजना सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ.मुंडे यांच्या हस्ते 25 अपंगाना प्रमाणपत्र वाटप  करण्यात आले. प्रत्येक अपंग विद्यार्थ्यांच्या खात्यावर 5000 रूपये जमा तसेच या कोर्सला 25 अपंग बसले होते. डॉ.संतोष मुंडे यांचे स्वागत भिसे कुटुंबा यांनी केले. यामुळे या प्रमाणपत्राचा अपंग विद्यार्थ्यांना नौकरीसाठी व भविष्यात कुठे गरज पडल्यास उपयोगी पडणार आहे. यावेळी मार्क 1 काँम्पयुर्स संचालक मंजुलदास भिसे, सौ.भिसे मँडम, सय्यद सुभान, साजन लोहिया, संतोष आघाव, धनराज कराड, फिरोज शेख, हरिभाऊ घाडगे, जिवन मुंडे, सुत्रावे मामा, शेख महबुब, लक्ष्मी आघाव, संगीता गित्ते, शामकन्या बदाडे, प्रधान, संजय घोबाळे  काँम्पयुटरचे सर्व कर्मचारी, अपंग विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या डॉ. संतोष मुंडे व मुंजाभाऊ भिसे यांच्या विशेष प्रयत्नामुळे 25 अपंग आज काँम्पयुटर साक्षर व नोकरीसाठी याचा फायदा होईल. त्यामुळे त्यांना काँम्पयुटर हाताळता येणे सोपे होऊन ते आजच्या युगात आपली प्रगती करतील. यांना मार्क 1 काँम्पयुर्स इन्स्टिट्यूट मध्ये गेली तीन महिने प्रशिक्षण दिले. डॉ. मुंडे म्हणाले की, कुठलेही काम करायचे असले की संगणका वरच होते. आता संगणक साक्षरता किती प्रसारित झाली हे महत्त्वाचे बनले आहे. मुठीत सामावलेले तंत्रज्ञान हे सर्व स्तरामध्ये पोहोचले आहे. दरम्यान डॉ. मुंडे व संचालक यांनी संगणक साक्षरते विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मार्क 1 काँम्पयुर्स संचालक मंजुलदास भिसे यांनी केले तर आभार संतोष आघाव यांनी केले.

No comments:

Post a comment