तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 15 April 2019

धनंजय मुंडेंच्या आज परळी मतदार संघात राडी, बरदापुर, घाटनांदूर, मांडवा, धर्मापुरी, उजनी पाटी येथे 6 झंझावती सभा


आघाडीच्या सर्व नेत्यांची उपस्थिती

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.15... बीड लोकसभेचे राष्ट्रवादी कॉंग्रेस व आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या उद्या सोमवार दि.15 एप्रिल रोजी  परळी विधानसभा मतदार संघात 6 झंझावती सभा होणार आहेत. 

या सभांना कॉंग्रेस नेते प्रा.टि.पी.मुंडे, संजय दौंड व आघाडीचे इतर नेते मंडळीही उपस्थित राहणार आहेत.

सकाळी 8 वा अंबाजोगाई तालुक्यातील राडी, 11 वा. बर्दापूर, दुपारी 01 वा. घाटनांदुर,  दुपारी 02 वा. मांडवा, सायं 06 वा धर्मापूरी व रात्रौ 08 वा उजनी पाटी इथे या सभा होणार आहेत.

 या सभेला माजी मंत्री पंडितराव दौंड, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष पापा मोदी, अक्षय मुंदडा, बन्सीअण्णा सिरसाट, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अजय मुंडे, दत्ताआबा पाटील, जि.प.सभापती राजेसाहेब देशमुख, विधानसभा अध्यक्ष गोविंद देशमुख, तालुकाध्यक्ष लक्ष्मणराव पौळ, जि.प.सदस्य प्रा.मधुकर आघाव, राजेश्‍वर चव्हाण, राजेभाऊ औताडे, रणजित चाचा लोमटे, शिवाजीराव सिरसाट, सौ.मिनाताई भताने, तानाजी देशमुख, समीर पटेल, मच्छिंद्र वालेकर, रख्माजी सावंत, गणेश देशमुख, अख्तर जहागीरदार, आसीम उस्मानी, विलास मोरे उपस्थित राहणार असल्याची माहीती प्रचार कार्यालयातून देण्यात आली आहे. 

परळीत शहरातील बुथ प्रमुखांचा मेळावा व व्यापार्‍यांची बैठक

दरम्यान श्री.सोनवणे यांच्या प्रचारार्थ परळीत सायं 04 वाजता शहरातील व्यापार्‍यांची बैठक व सायं 05 वाजता बुथ प्रमुखांचा मेळाव्यात धनंजय मुंडे हे मार्गदर्शन करणार असल्याची माहिती शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी दिली.

No comments:

Post a comment