तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 10 April 2019

जिंतुरमधील 73 गावातील ग्रामस्थांनी वॉटर कप स्पर्धेसाठी कंबर कसलीगाव पाणीदार करण्यासाठी मध्यरात्रीपासून श्रमदानास सुरुवात

         जिंतूर तालुक्यातील 73 गावांमध्ये पाणी फाउंडेशन सत्यमेव जयतेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या वॉटर कप स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्यासाठी व आपले गाव पाणीदार करण्यासाठी ग्रामस्थ पुनश्च सैराट झाले असून रविवार 8 एप्रिल रोजी मध्यरात्री 12 वाजल्यापासून  श्रमदानास सुरवात करण्यात आली आहे. तर वॉटर कप स्पर्धेत बाजी मारण्याकरीता ग्रामस्थांनी घाम काढण्यास सुरुवात केली आहे.


चित्रपट अभिनेते अमीर खान व त्यांच्या सर्व टीम ने ही स्पर्धा आयोजित केली असून गतवर्षी या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक 50 लाख रु होते तर या वर्षी 75 लाख रु करण्यात आले आहे. या स्पर्धेत तालुक्यातील 156 गांवाणी  सहभाग घेतला होता पैकी 73 गावात प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे . आपला तालुका पाणीदार करण्यासाठी गावातील ग्रामसेवक, सरपंच,ग्रामस्थ यांच्या संयुक्त बैठका घेऊन त्यांना पाणीबचतीचे महत्व समजावून सांगितले तर अनेक गावातील नागरिक,महिला,ग्रामसेवक यांना प्रशिक्षण घेण्यासाठी पाठविण्यात आले होते. ज्यांनी प्रशिक्षण घेतले अशाणी गावातील इतर नागरिकांना प्रशिक्षण दिले त्यामुळे पाणी अडवा पाणी जिरवा ही लोकचळवळ झालि अनेक ठिकाणी महिला,तरुण ,शाळकरी विध्यार्थ्यानी श्रमदान करून पावसाळ्यात लावण्यासाठी रोपे तयार केली तर अनेक गावात रात्री ही मोठ्या प्रमाणात महिला,तरुणी श्रमदानासाठी तयार झाल्या तालुक्यातील अनेक गावात पाण्याचे नियोजन नसल्याने या गावना उन्हाळ्याच्या सुरवाती पासूनच पाणी टंचाईला सामोरे जावे लागते त्यामुळे अनेक गावातील कुटुंबे उन्हाळ्यात पाणी टंचाई मळे आपली घरदार,शेतीवाडी सोडून  उदरनिर्वाह करण्यासाठी शहरा कडे धाव घेतात या गावातील नागरिकांना गाव सोडून जावे लागू नये म्हणून तसेच उन्हाळ्यात महिला ,मुलींना पाण्यासाठी भटकावे लागू नये म्हणून पावसाचे पडणारे पाणी तसेच प्रत्येक घरातील सांडपाणी हे जमिनीत मुरवावे म्हणून जागोजागी ,वयक्तिक व सार्वजनिक शोषखड्डे घेण्यात आले आहे तसेच पावसाचे पडणारे पाणी वाहून जाऊ नये म्हणून बांध टाकून तर कुठे चर खणून ते अडवण्याची तयारी करण्यात आली आहे या श्रमदानासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक,महिला,तरुण,तरुणी, विध्यार्थी परिश्रम घेत आहे. 

No comments:

Post a Comment