तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 28 April 2019

सीएम आणि डीएम हे मोस्ट वाॅंटेड`! पण पवारांच्याही 78 व्या वर्षी 79 सभामुंबई (प्रतिनिधी) :-  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेेते धनंजय मुंडे हे राज्यातील लोकसभा निवडणुकीतील खरे स्टार प्रचारक ठरले. या तिघांनीही या निवडणुकीत प्रचाराचा धुमधडाका लावत सर्वाधिक सभा घेतल्या. 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यभरात 87 सभा घेत उच्चांक गाठला. धनंजय मुंडे (डीएम) यांच्याही 80 सभा झाल्या. शरद पवार यांच्या 78 सभा झाल्या. वयाच्या 79 वर्षी पवार यांच्या 78 सभा झाल्या, हे यातील विशेष. या वयात एवढी धावपळ करणारा दुसरा नेता देशातही नाही. नेत्यांच्या फक्त मोठ्या जाहीर सभा यात मोजल्या आहेत. निवडणूक काळातील बैठका,  कार्यकर्त्यांना मार्गदर्शन यांचा यात समावेश नाही.

सर्वात विशेष बाब ही शरद पवार यांची. लोकसभा निवडणुकीच्या चारही टप्प्यांत पवार यांनी 78 सभा घेतल्या. त्यांचाही हेलिकाॅप्टर प्रवास भरपूर झाला. बारामतीहून नाशिक, नाशिकहून रायगड असे मतदारसंघ ते गाठायचे. नगर, माढा, कोल्हापूर या मतदारसंघांवर त्यांनी अधिक लक्ष केंद्रीत केले. रोज किमान तीन सभा त्यांनी घेतल्या. या काळात हैदराबादमध्ये जाऊन त्यांनी चंद्राबाबू नायडूंसोबत पत्रकार परिषद घेतली. 

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सर्वाधिक काळ मावळ लोकसभा मतदारसंघात पार्थ यांच्या प्रचारावर लक्ष केंद्रीत करावे लागले. तरी त्यांनी बारामती, शिरूर, रायगड, बीड, परभणी, माढा या मतदारसंघात सभा घेतल्या. त्यांनी नगरमध्ये भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्याविरोधात प्रचार सभा घेतली नाही, याचीच चर्चा जास्त झाली. 

काॅंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मुंबई, नांदेड, चंद्रपूर, धुळे, संगमनेर, वर्धा, नागपूर या शहरात सभा घेतल्या. धुळे येथील त्यांची सभा निवडणूक जाहीर होण्याच्या दोन दिवस आधी झाली होती. त्यांनी निवडणूक काळात पुण्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता.

No comments:

Post a comment