तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 8 April 2019

संभाजी ब्रिगेडचा विटेकरांना पाठिंबा;मराठा समाजाची नाराजी सेनेला भोवनारप्रतिनिधी
सेलू :- लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मराठा सेवा संघ-संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनेंने संयुक्त पुरोगामी आघाडीचे उमेदवार राजेश विटेकर यांना जाहीर पाठिंबा दिला असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेशउपाध्यक्ष छगन शेरे यांनी दिली.
मोदी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. लाखोंच्या संख्येने मराठा समाजाने काढलेल्या मराठा क्रांती मोर्चाची एकही मागणी मान्य न करता मराठा समाजाच्या भावनांचा अवमान केला आहे. यामुळे मराठा समाजात अस्वस्थता पसरली आहे. 
पुरोगामी चळवळीतील विचारवंताच्या हत्या, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याने संघ परिवार व मोदी सरकार पुरोगामी चळवळ मोडीत काढण्याचा डाव आखत असुन संभाजी ब्रिगेड हा डाव कदापि यशस्वी होऊ देणार नाही. तसेच मराठा नेत्यांचे राजकारण संपुष्टात आणण्याचा प्रयत्न देखील भारतीय जनता पार्टी करित असून असल्या घाणेरड्या राजकरणाचा निषेध नोंदवत काॅग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप या पुरोगामी आघाडीचे उमेदवार राजेश विटेकर यांना जाहीर पाठिंबा देत असल्याचे छगन शेरे यांनी यावेळी जाहीर केले.


मराठा समाजाची नाराजी शिवसेनेला भोवणार

मराठा क्रांती मोर्चाच्या वेळी दैनिक सामना मध्ये मुका मोर्चा म्हणुन क्रांती मोर्चाची बदनामी करुन औरंगाबाद येथील क्रांती चौकात सताधा-यां विरोधात घोषणाबाजी करणा-या मराठा तरुणांना शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. तसेच मुंबईतील राज्यव्यापी मराठा क्रांती मोर्चाला सुविधा नाकारत आधी पैसे भरा सांगणा-या महापालिकेत शिवसेनेची सत्ता असल्याने मराठा समाजाची नाराजी यालोकसभा निवडणुकीत शिवसेनेला फटका बसणार असल्याचे देखिल छगन शेरे यांनी यावेळी बोलतांना सांगितले.

No comments:

Post a Comment