तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 2 April 2019

भाजपाचे अपंग आघाडीचे प्रमुख रणजित रायभोळे यांचा डॉ. संतोष मुंडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन भाजपाचे अपंग आघाडीचे प्रमुख रणजित रायभोळे यांनी  राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.दरम्यान डॉ. मुंडे यांनी रायभोळे यांचे पुष्पगुच्छ व पक्षाचा गमजा देऊन स्वागत केले. 

    शहरातील भाजपाचे अपंग आघाडीचे  प्रमुख रणजित रायभोळे व असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा मोठा धक्का बसला आहे. सर्व कार्यकर्त्यांनी पक्ष मजबुतीकरीता अथक परिश्रम घेऊ असा शब्द देत जल्लोष केला.
त्यामुळे भाजपातून राष्ट्रवादीत घरवापसी सुरु झाली असल्याचं दिसत आहे. ना.धनंजय मुंडे हे अपंगाचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव तत्पर असता म्हणून त्यांच्या नेतृत्वावर विश्वास  ठेऊन आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अपंगाची व जनतेची या भाजपा सरकारने दिशाभूल केली आहे. अपंगांच्या कुठल्याच प्रश्नांची या सरकारला जाण नाही. पाच वर्षात मोकळेच आश्वासन दिले. अपंगाची कुठलीच योजना अमंलात आणली नसल्याची त्यांनी सांगितले.  राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी त्यांचा सत्कार करून प्रवेशाचे स्वागत केले. आगामी निवडणुकीत ना.मुंडेंचे नेतृत्व अधिक बळकट करण्यासाठी आपण संपूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी रायभोळे म्हणाले.  
        दरम्यान भारतीय जनता पार्टीमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांना आता न्याय मिळत नाही. त्यांना नविन नेतृत्वाकडुन आपमानास्पद वागणुक मिळु लागल्याने आपण व्यथित होऊन ना.धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत असल्याचे अपंग आघाडीच्या पदाधिकारी यांनी यावेळी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment