तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 13 April 2019

ना. पंकजाताई मुंडेंविषयी अपशब्द काढणा-या मेटे, पोटभरेंविरूध्द बहूजन समाजात संतापाची लाट !


अपक्ष उमेदवार गणेश कोळेकर, शेषराव वीर यांनी दिला डाॅ. प्रीतमताई मुंडेंना पाठिंबा

बीड (प्रतिनिधी) :- दि. १३ ------ राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या विषयी अपशब्द काढणारे आ. विनायक मेटे व बाबुराव पोटभरे यांच्या विरूध्द बहुजन समाजात तीव्र संताप पसरला आहे,  याचा परिणाम म्हणून अपक्ष उमेदवार गणेश कोळेकर आणि शेषराव वीर यांनी आज भाजपा महायुतीच्या उमेदवार डाॅ प्रितमताई मुंडे यांना आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. 

   भाजपा महायुतीच्या उमेदवार डाॅ प्रितमताई मुंडे यांच्या प्रचारार्थ पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांची आज चौसाळा येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत बहूजन समाजात नेतृत्व असणारे अपक्ष उमेदवार गणेश कोळेकर आणि शेषराव वीर यांनी आपला पाठिंबा व्यक्त केला. यावेळी सभेत बोलताना कोळेकर आणि वीर म्हणाले की, लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब ख-या अर्थाने बहूजनांचे नेते होते. वंचित समाजाला सोबत घेऊन त्यांनी बहूजनांची मोट बांधली. आज याच वंचित बहूजनांना सन्मान देऊन त्यांना सोबत घेऊन चालण्याची क्षमता    ना. पंकजाताई मुंडे यांच्याकडे आहे.   त्यांचे नेतृत्व उत्तुंग आहे. अशा या नेतृत्वा विषयी आ. विनायक मेटे व बाबुराव पोटभरे यांनी अपशब्द काढून केवळ त्यांचाच नव्हे तर समस्त बहूजनांचा अवमान केला आहे. मुंडे साहेबांनी पोटभरेंना पाठबळ दिले तर मेटेंना पद, पैसा, प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम केले पण या दोघांनीही स्वतःच्या स्वार्थासाठी पुन्हा एकदा धोका दिला आहे. ना. पंकजाताई मुंडे यांच्या सारख्या नेत्याबद्दल मेटे, पोटभरेंनी खालच्या पातळीवर जाऊन जी टीका केली त्याबद्दल आमच्या मनात चीड निर्माण झाली आहे. आमच्या उमेदवारीमुळे बहूजनांची मते वाया जाऊ नयेत म्हणून आम्ही डाॅ. प्रितमताई मुंडे यांना पाठिंबा देत आहोत, या निवडणुकीत मतदारांनी त्यांनाच प्रचंड मताधिक्याने विजयी करावे आणि बहूजनांचे नेतृत्व जपावे असे आवाहन कोळेकर आणि वीर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment