तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 28 April 2019

लिंबुटेकरांच्या कष्टाला नशिबाची साथ वाटरकप स्पर्धेत एक लाखाच्या मदतीसाठी निवड


महादेव गित्ते
----------------------------
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.28 (प्रतिनिधी) पानी फाऊंडेशनच्या वाटरकप स्पर्धेतील मशीन कामे करण्यासाठी दिल्याजाणाय्रा एक लाखाच्या आर्थिक मदतीसाठी परळी तालुक्यातील मोजे.लिंबुटा गावाची निवड झाली आहे.या मदतीमुळे नाला खोलीकरण व रूंदीकरन कामे करण्यास गावकय्रांना बळ मिळणार आहे.श्रमदान करण्यासही प्रेरणा मिळणार आहे.
   अमीर खान यांच्या     पानी फाऊंडेशनचा "तुफान आलया"हा कार्यक्रम दर शनिवारी रात्री 9.30 वा.झी टी. व्ही.मराठी या वाहीनिवर असतो. अहमदनगर येथील 'स्नेहालय' या स्ंस्थेच्या मार्फत वाटरकप स्पर्धेतील गावांना इश्वर चिठ्ठीच्या माध्यमातून मशिन कामे करण्यासाठी एक लाखाची आर्थिक मदत दिली जाते.शनिवार, दि.27 एप्रिल रोजी झालेल्या कार्यक्रमात परळी तालुक्यातून मोजे लिंबुटा या गावाची निवड झाली आहे.
    या गावातून प्रशिक्षण घेण्यासाठी जायला अखेर पर्यंत एकही  तरूण /षुरूष तयार झाला नही.अखेर सौ.मीनाक्षी भागवत मुंडे व आशा वर्कर अर्चना निव्रती केकान या दोन महिला प्रशिक्षण घेऊन आल्या. श्रमदानाचे कामं सुरु करण्यासाठी प्रयत्न रत होत्या. परंतु फारसा प्रतिसाद मिळाला नाही त्यांना गतवर्षी प्रशिक्षण घेउन आलेले राहूल सुदाम मुंडे,भागवत धोंडिबा मुंडे,  तसेच बबन  मुळे, सौ रेखा मुळे,सौ.सुलभा खुशाल कांबळे,ऋषिकेश  इद्रमोहन मुंडे,अक्षय विष्णुदास मुंडे आदिची साथ मात्र भक्कम मिळाली. ग्रामपंचायतिनेही खोरे, टिकावं, टोपले देऊन मदतीचा हात पुढे केला.  श्रमदानात गावकय्रांचे योगदान चांगले मिळावे यासाठी वाटरकप टीमने दोन कर्यक्रम घेतल्यानंतर मात्र महिला व पुरुष दोन्हींचा चांगला प्रतिसाद मिळाला.परतू तो काही दिवसच टिकला.
आता या एक लाखाच्या मदतीमुळे गाव एक होउन श्रमदानाला लागेल . जलसंधारणाच्या माध्यमातून गाव पाणीदार करून इतिहास घडवतील असा निश्चितच विश्वास आहे. तालुका समनवयक रमेश शेप, व प्रशांत इखे यांच्या मार्गदर्शनाखाली वाटरकप ची टीम मेहनत घेत आहे.

No comments:

Post a comment