तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 29 April 2019

परळीत क्षुल्लक कारणावरुन दोघांना मारहाणपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  'तू रामराम का केला नाही?' या क्षुल्लक कारणावरुन एकाने दोघांना मारहाण केली. ही घटना
टोकवाडी येथील बसथांब्यावर शुक्रवारी घडली.

नागनाथ संतराम काळे (रा.टोकवाडी ता.परळी) याने गावातील ज्ञानोबा विठ्ठल मुंडे यांना 'रामराम का केला नाही? या कारणावरुन वाद घालत शिवीगाळ.केली. त्यानंतर यांच्या डोक्यात वीट मारुन गंभीर दुखापत केली. हे भांडण सोडवण्यास आलेले मुंडे यांचे मेहुणे विठ्ठल माणिक आघाव यांनाही चावा घेवून जखमी केले. या प्रकरणी ज्ञानोबा मुंडे यांच्या तक्रारीवरुन ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

No comments:

Post a comment