तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 16 April 2019

सेनेचे गोपाळ जाधव यांचा राकाँत प्रवेश


प्रतिनिधी
पाथरी:-तालुक्यातील पिंपळगाव येथिल निष्ठावान सैनिक तथा लिंबा सर्कलचे माजी प्रमुख असलेले गोपाळ जाधव आंबेगावकर यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
या वेळी राकाँ तालुकाध्यक्ष एकनाथराव शिंदे,जि प चे माजी सभापती सुभाषराव कोल्हे,कृउबास पाथरीचे सभापती अनिलराव नखाते,जि प चे माजी शिक्षण आणि आरोग्य सभापती दादासाहेब टेंगसे,लिंबाजी मिरजे,ज्ञानेश्वर काळे, भगवान काळे तुकाराम बुरगे,रामेश्वर भालसत्रै यांची या वेळी उपस्थिती होती. अनेक वर्ष शिवसेनेत काम करत असतांना ही सेना पधाधिकारी यांच्या कडून नेहमी दुजाभावाची वागणूक मिळत असल्याने लोकसभा निवडणुकीची योग्य संधी साधत राजेश विटेकरां सारख्या नम्र संयमी आणि कार्यशिल युवा नेतृत्वाला जास्तित जास्त मताधिक्य देण्या साठी आपण प्रामाणिक पणे देण्या साठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले पाथरी शहरातील राष्ट्रवादी भवन येथे वरील मान्यवरांच्या हस्ते गोपाळ जाधव यांचा मंगवारी १६ एप्रिल रोजी पुप्पहार घालुन स्वागत करण्यात आले.

No comments:

Post a Comment