तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 28 April 2019

सेलूत अखंड नामजप यज्ञ सप्ताहास उत्साहात सुरुवातसेलू (जि.परभणी ) : येथील मारूती नगर व महेश नगर भागातील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व बालसंस्कार केंद्रात अखंड नामजप यज्ञ सप्ताह सोहळ्यास उत्साहात सुरुवात झाली आहे.

शुक्रवारी ( ता.२६ ) सकाळी आठ वाजता भूपाळी आरतीने सप्ताहास प्रारंभ झाला. सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 
सप्ताहकाळात दररोज षोडोशोपचार अभिषेक , अखंड प्रहर सेवा , सामूहिक गुरुचरित्र पारायण,  त्रिकाळ आरती, श्री गणेश याग, श्री चंडी याग, श्री स्वामी याग, श्री विष्णू याग, श्री रूद्र याग आदी विविध याग, अब्जचंडी अंतर्गत विविध सामूहिक पाठ, श्री औदुंबर प्रदक्षिणा अशा अनेकविध सेवा रुजू होत आहेत.भाविक मोठ्या संख्येने या सप्ताहात सहभागी झाले आहेत. शुक्रवारी ( ता.२ मे ) सांगता होणार आहे.

फोटो : सेलू येथील मारूती नगरातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात श्री चंडी याग सेवा रूजू करतांना भाविक. 

(दुसऱ्या छायाचित्रात ) श्री गुरूचरित्र पारायणात सहभागी भाविक

No comments:

Post a comment