तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 16 April 2019

लोकनेते गोपीनाथराव मुंडे हे नामांतर लढ्याचे शिलेदार त्यांच्या वारसांना आंबेडकरी जनतेने ताकद द्यावी - धम्मानंद मुंडेपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  15.......... लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर लढ्याचे शिलेदार असुन त्यांनी आयुष्यभर वंचित, उपेक्षितांचा आवाज बनुन काम केले आहे. तोच वारसा त्यांच्या कन्या चालवत असुन खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांना पुन्हा संसदेत पाठविण्यासाठी आंबेडकरी जनतेने आपली मतदानरुपी ताकद त्यांच्या पाठीशी उभी करावी असे आवाहन रिपाइं प्रदेश उपाध्यक्ष धम्मानंद मुंडे यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी आयुष्यभर दलित आणि मागासवर्गीयांना ताकद दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर लढ्यात त्यांनी महत्वाची भूमिका निभावली. त्यासाठी त्यांना कारागृहात जावे लागले. तरी त्यांनी आपली साथ सोडली नाही. हाच वसा आणि परंपरा त्यांच्या कन्या ना.पंकजाताई मुंडे व खा.डॉ. प्रितमताई मुंडे या चालवत आहेत. भारतीय राज्य घटनेबद्दल मुंडे भगिनींना प्रचंड आदर आहे. विरोधकांनी सामाजिक ऐक्य व सलोखा बिघणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन करून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी अंबाजोगाईला येऊन सभा घेऊन समाजाने एकमुखी पाठींबा देण्याचे आवाहन केले आहे.  केंद्रामध्ये विकास, विविध योजना, राष्ट्रीय व परराष्ट्रीय धोरण ठरविण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणार्‍या सभागृहामध्ये तसाच विव्दान उमेदवार लागतो. खा.डॉ. प्रितमताई मुंडे या विव्दान आणि अभ्यासू आहेत. मात्र कांही लोक हे बहुजनांचे नेतृत्व बदनाम करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. अशा ढोंगी पुढार्‍यांपासून सावध राहून जातीवाद पेरणार्‍यांना धडा शिकवण्याची गरज आहे असे सांगुन या निवडणुकीत आपली मतदानाची ताकद खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या पाठीशी उभी करून त्यांना प्रचंड मताने विजयी करावे असे आवाहन रिपाइं प्रदेश उपाध्यक्ष धम्मानंद मुंडे यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

No comments:

Post a Comment