तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 17 April 2019

बजरंगाची कमाल होईल धमाल-सोमनाअप्पा हालगे शेतकरी व सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडविण्यसाठी बजरंग सोनवणे यांना


विजयी करा- श्री व सौ हालगे यांचे आवाहन 

महादेव गित्ते
-------------------------
परळी वैजनाथ  (प्रतिनिधी) :- दि.17
    बीड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आय, शेकाप स्वाभिमानी शेतकरी संघटना पीआरपी कवाडे गट, मानवी हक्क अभियान व मित्र पक्ष आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री बजरंग मनोहर सोनवणे यांना विक्रमी मतांनी निवडून देण्याचे आवाहन परळीचे माजी नगराध्यक्ष सोमनाथअप्पा हालगे व नगराध्यक्षा सौ.सरोजनी सोमनाथअप्पा हालगे यांनी केले आहे. 
    बजरंग सोनवणे हे शेतकरी पुत्र असल्याने त्यांना नागरिकांच्या समस्यांची जाण आहे. निश्‍चित ते नागरिकांच्या समस्या सोडवून विकास कामांला प्राधान्य देतील असा विश्‍वास व्यक्त करीत बजरंग सोनवणे यांना मत म्हणजे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाला मत आहे. त्यामुळे सोनवणे यांना मतदान करुन लोकसभेत निवडून पाठवावे असे आवाहनही हालगे यांनी केले आहे. 
    माजी नगराध्यक्ष सोमनाथ अप्पा हालगे यांनी सोमवारी निवडणुकीच्या अनुषंगाने बोलतांना सांगितले की, 18 एप्रिल रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंन्त लोकसभा निवडणुकीचे मतदान होणार आहे. लोकसभेच्या बीड मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते शरदचंद्र पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजयजी मुंडे व पक्षश्रेष्ठींनी शेतकरी पुत्र व सर्व सामान्य असलेल्या बजरंग सोनवणे यांना राष्ट्रवादी काँग्रेस व आघाडीचे उमेदवारी दिली आहे. त्यांनी आपल्या साखर कारखान्याच्या माध्यमातुन शेतकर्‍यांच्या ऊसाला चांगला भाव दिला आहे. ऊस घेऊन गेल्यानंतर 8 दिवसात ऊसाचे पेमेंट करुन शेतकर्‍यांना सहकार्य केले आहे. परळी मतदार संघातुनही त्यांच्या कारखान्याने शेतकर्‍यांचा ऊस गाळपासाठी घेऊन जाऊन मदत केली आहे. 
    विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व जिल्ह्यातील इतर नेत्यांनी बजरंग सोनवणे यांच्या प्रचारासाठी मतदारसंघ पिंजुन काढला आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात बजरंग बप्पाची हवा निर्माण झाली आहे. बजरंगाची कमाल होईल धमाल असे म्हणण्याची वेळ आली आहे. जिल्हयात बजरंग सोनवणे यांची स्थिती मजबूत झाली आहे. असा दावाही माजी नगराध्यक्ष सोमनाथअप्पा हालगे यांनी केला आहे. 
    सोमनाथअप्पा हालगे पुढे म्हणाले की, परळीकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्‍न बनलेल्या परळी-पिंपळा धायगुडा रस्ताचे काम दोन वर्षापासुन रखडले आहे. हा मार्ग दोन्ही बाजुंनी खोदून ठेवल्याने प्रवशांचे हाल होत आहेत. रुग्णांनाचाही जिव धोक्यात आला आहे. परळीच्या उपजिल्हा रुग्णालयातुन अंबाजोगाईला रुग्ण हलविल्यास अशा रुग्णांना या मार्गावरुनच अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात घेऊन जावे लागते. हा परळी-पिंपळा धायगुडा रस्ता मौत का कुवाच बनला आहे. या रस्त्याच्या प्रश्‍नी प्रिया नगर, बँक कॉलनी, व परिसरातील नागरिक आंदोलनास बसले असता त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन सर्व सामान्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न शासनाने केला आहे. परळीच्याच पालकमंत्री व ग्रामविकासमंत्री असुनसुध्दा त्यांनाहा रस्त्याचा प्रश्‍न वेळेच्या आत सोडविता आला नाही. पुर्वीचा डांबरीकरणाचा रस्ता बरा म्हणण्याची वेळ आली आहे. शासकीय अधिकार्‍यांवर पालकमंंत्र्याचा वचकच नसल्याने व परळीच्या विकासाचे काही देणे घेणे नसल्याचे या रस्त्याच्या कामांवरून सिध्द होते. परळी बाह्य वळणाच्या रस्त्याचे उद्घाटन होऊन अनेक वर्ष झाले. परंतु या रस्त्याचे काम अद्याप सुरु केले नाही. त्यामुळे डॉ.शामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपुलावर वाहतुकीची कोंडी होत आहे. बसस्टँण्ड, आझाद चौक याठिकाणीही वाहतुक विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. परळी-पिंपळा धायगुडा रस्त्याचे हाल पाहुन वैद्यनाथ महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थींनीही वैतागले आहेत. या रस्त्यावरुन येणार्‍या जाणार्‍या विद्यार्थ्यांचे चेहरेही बदलत गेले आहेत. अशी टिकाही हालगे यांनी केली आहे. 
    वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पालकमंत्री पंकजा मुंडे ह्या असतांनाही त्यांनी वैद्यनाथ कारखान्याला गतवैभव प्राप्त करुन दिले नाही. उलट शेतकर्‍यांच्या ऊसाला योग्य भाव दिला नाही. त्यामुळे शेतकर्‍यांत नाराजी सुर आहे. हा असंतोष मतदान पेटीतुन शेतकरी बांधव व्यक्त करतील. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे विकासपुरुष असुन त्यांच्या नेतृत्वाखाली परळीशहरात नगर परिषदेच्या माध्यमातुन विकासाची कामे सुरु आहेत. परळी नगर परिषदेच्या इमारतीचे बांधकाम, नटराज रंगमंदिराचे नुतनीकरण, समाज मंदिर, रस्ते, नाल्या, फुटपाथ ही कामे करण्यात आली आहेत. त्यामुळे सर्व सामान्यांची सोय झाली आहे. पुढील 25 वर्ष परळीकरांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासुनये यासाठी वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम चालु असुन ते अंतिम टप्पयात आहे. परळीचा विकास करण्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच समर्थ आहे. याला काँग्रेस व मित्र पक्षाचे सहकार्य आहे. बजरंग सोनवणे हे सुध्दा विकास कामांसाठी धडपडणारे नेतृत्व आहे. यामुद्दयावर लोकसभा निवडणुकीत बजरंग सोनवणे यांना मतदार करुन विक्रम करावा असे आवाहनही श्री. हालगे यांनी केले. 
    
    
    

    

No comments:

Post a Comment