तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 11 April 2019

महात्मा फुले यांच्या शिक्षण क्रांतीमुळे समाज तर्क करण्यास शिकला - आबासाहेब वाघमारे


 परळी वैजनाथ  (प्रतिनिधी) :-  राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांनी केलेल्या शैक्षणिक व सामाजिक क्रांतीमुळे भारतीय समाज तर्क करावयास शिकला असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यीक आबासाहेब वाघमारे यांनी केले. लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या महात्मा जोतीराव फुले यांच्या 192 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमा ते मार्गदर्शन करताना बोलत होते. परळी पत्रकार संघ व फुले-आंबेडकरी अभ्यास समुह यांच्यावतीने 11 एप्रिल महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणुन सामाजिक कार्यकर्ते राजकुमार डाके, प्रमुख वक्ते म्हणुन ज्येष्ठ पत्रकार व साहित्यीक रानबा गायकवाड, इंजि. जयपाल कांबळे उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना आबासाहेब वाघमारे म्हणाले की, ज्या काळात स्त्रियांवर अनेक बंधने होेती त्याकाळात महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षण व स्त्रियांच्या उद्धारासाठी काम केले. यावेळी रानबा गायकवाड, राजकुमार डाके, जयपाल कांबळे यांनीही विचार मांडले. कार्यक्रमास अरूण जाधव, प्रा. दशरथ रोडे, विकास वाघमारे, प्रा.ब्रम्हानंद कांबळे , बापु गायकवाड, अ‍ॅड. कपिल चिंडालीया, धम्मा गोरे, सचिन रोडे, गरड आदिंची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व प्रास्ताविक संयोजक भगवान साकसमुद्रे यांनी केले.

No comments:

Post a Comment