तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 13 April 2019

राहुल गांधी यांना देशाचे पंतप्रधान करण्यासाठी आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना विजयी करा- लहुदास तांदळे


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- बीड लोकसभा निवडणुकीचा प्रचाराने वेग घेतला असून जिल्‍ह्यात भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस, राष्‍ट्रवादी काँग्रेस, आरपीआय (कवाडे गट), शेकाप,  स्‍वाभिमानी शेतकरी संघटना व मित्र पक्ष संपूर्ण ताकतीने आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना प्रचंड मतांनी विजय करा असे आवाहन  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते लहुदास रामभाऊ तांदळे (सारडगाव) यांनी केले आहे. मांडवा पंचायत समिती गणातुन आघाडीची लिड देणार असल्याचे ही त्यांनी सांगितले. त्यामुळे आपले अमुल्य मत बजरंग सोनवणे यांना देण्याचे अवाहन केले. 

   भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना,रिपाई (कवाडे गट)  व मित्र पक्ष आघाडीचे लोकसभेचे उमेदवार शेतकरीपुत्र बजरंग सोनवणे यांना विजयी करुन भारतीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रवादी अध्यक्ष राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्यासाठी आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन तांदळे सारडगावकर यांनी केले.
  दरम्यान, काँग्रेसचे योगदान देश कधीच विसरणार नाही. सद्यस्थितीत भाजपा सरकाराची हुकूमशाही राजवटीला सर्वसामान्‍य जनता कंटाळली असून देशात काँग्रेसचे सरकार येणार आहे. तसेच भाजपा सरकारच्या गेल्या पाच वर्षाच्या काळात सर्वसामान्य जनता कष्टकरी, शेतमजूर आणि शेतकरी सर्व बाजूने अन्याय झालेला आहे, त्यांना जर न्याय मिळवून द्यायचा असेल तर हे सरकार सत्तेवरुन खाली खेचले पाहिजे. यावेळी बोलतांना म्हणाले की, भाजपा सरकारच्या कार्यकाळात सर्वसामान्य जनतेवर झालेल्या अन्यायाचा पाडाच वाचला. नोटाबंदी, पेट्रोल-डिजेल दरवाढ, गॅसची दरवाढ आदींचा उहापोह करत फसवी कर्जमाफी करुन शेतकर्‍यांच्या जखमेवर सरकारने मीठ चोळले आहे. या सरकारमधील असणार्‍या मंत्र्यांना सर्वसामान्य जनता आणि शेतकर्‍याचे काहीही देणेघेणे नाही त्यामुळे प्रश्नांचा गुंता गेल्या पाच वर्षात वाढतच गेलेला आहे. विकासाच्या नुसत्या गप्पा मारणार्‍या सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मित्रपक्षच सर्वसामान्य जनतेची काळजी घेणारे पक्ष आहेत त्यामुळे या महाआघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना प्रचंड मतांनी विजयी करुन न्याय देणारे सरकार आपल्याला दिल्लीच्या तख्तावर बसवायचे आहे. तसेच देशाचे पंतप्रधान करण्यासाठी राहुल गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी  आपले अमुल्य मत बजरंग सोनवणे यांना देऊन प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते लहुदास तांदळे यांनी एका प्रसिद्ध पत्रकात म्हणटले आहे. विकासाला आणि प्रगतीला साथ देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

No comments:

Post a Comment