तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 4 April 2019

एका आमदारासह शिक्षकावर आचारसंहिता भंग प्रकरणी गुन्हा दाखलआचारसंहिता भंग प्रकरणाची तालुक्यातील दुसरी घटना

मंगरुळपीर तालुक्यातील प्रकार

फुलचंद भगत (जिल्हा प्रतिनिधी)
वाशिम- आदर्श आचारसंहितेचे कुणी ऊल्लंघन करीत असेल तर सबंधितावर कठोर कारवाई करावी असे जिल्ह्याधिकारी यांनी आदेश दिल्यानंतर मंगरुळपीर तालुक्यात या आदर्श आचारसंहितेचा भंग करन्याच्या दोन घटना घडल्या आहेत.शिक्षक मतदार संघाचे  आमदार श्रीकांत गोविंदराव देशपांडे यांनी घोषणा केल्याप्रकरणी व  विनापरवानगी सत्कार समारंभ आयोजित केल्या प्रकरणी आमदारासह  एका  शिक्षकांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने  शिक्षक वर्गात  एकच खळबळ उडाली आहे. मंगरुळपिर पोलीस स्टेशनला आचारसंहिता भंगाचा हा दुसरा गुन्हा आहे 
आमदार श्रीकांत देशपांडे यांनी मंगरुळपिर तालुक्यातील  अनुदानित शाळेला भेटी देऊन शिक्षकांना विविध कामे करून देण्याची घोषणा केली.  शिक्षक माणिकराव श्रीराम गंगावणे यांनी सहायक निवडणूक अधिकाऱ्यांची परवानगी न घेताच  स्वतःच्या  घरी आमदार श्रीकांत देशपांडे यांचा सत्कार समारंभ आयोजित केला. घरावर सत्कार समारंभाचे  बॅनर लावले. सदर प्रकरणी  नायब तहसीलदार तथा भरारी पथक प्रमुख सुभाष रामजी जाधव यांच्या तक्रारीवरून आ।दार श्रीकांत देशपांडेसह शिक्षक माणिकराव गंगावणे  विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याआधी चालु गाडीत भोंगे वाजवुन निवडणुकीचा प्रचार केल्याप्रकरणीही एका गाडी ड्रायव्हरवर गुन्हा दाखल आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835

No comments:

Post a Comment