तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 10 April 2019

विरोधीपक्ष नेते श्री. धनंजय मुंढे यांच्या जाहीर सभेचे जिंतूरात आयोजन


नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे –  आ. विजय भांबळे

जिंतूर :- राष्ट्रवादी कॉंग्रेस, राष्ट्रीय कॉंग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, पीपल्स रिपब्लिकन पार्टी(कवाडे गट) यांच्या संयुक्त आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री.राजेश(दादा) उत्तमराव विटेकर यांच्या प्रचारार्थ मा.श्री. धनंजय मुंढे साहेब (विधान परिषद विरोधी पक्षनेते) यांच्या जाहीर सभेचे  आयोजन दि.१२/०४/२०१९ रोजी सकाळी १०:०० वाजता दादा शरीफ चौक, जिंतूर येथे करण्यात आले आहे.

  या सभेस मा.फौजिया खान मॅडम (माजी राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य), मा.आ.श्री.सुरेशराव वरपूडकर, (माजी राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य), मा.तुकाराम रेंगे(माजी खासदार), मा.सुरेश देशमुख (माजी आमदार), मा.सुरेश जाधव (माजी खासदार),   मा.आ.बाबाजानी दुर्रानी, (जिल्हाध्यक्ष परभणी), मा.आ.विजयराव भांबळे, मा.आ.श्री.मधुसूदन केंद्रे, मा. रशिकाताई ढगे    (प्रदेशाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना), मा.नारायण मुंढे  (RPI जिल्हाध्यक्ष) यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

 त्यासाठी जिंतूर येथील सभेस नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार विजय भांबळे यांच्या कडून करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment