तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 13 April 2019

सातारा जिल्ह्यातील पत्रकारावर कोयत्याने हल्ला!मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने जाहीर निषेध!



बाळू राऊत जिल्हा प्रतिनिधी
सातारा : सातारा जिल्ह्यातील
शिरवळ येथील लोकमत चे पत्रकार मुराद पटेल यांच्यावर काल रात्री उशिरा 6 अज्ञात व्यक्तींनी कोयत्याने हल्ला केला त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. मुराद यांना तातडीने  उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे ल.या संदर्भात रात्री उशिरा सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पटणे यांनी सातारा जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. सातपुते यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश त्यांनी दिले असून हल्लेखोरांना तातडीने अटक करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने या हल्ल्याचा तीव़ शब्दात धिक्कार केला आहे.!

No comments:

Post a Comment