तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 10 April 2019

आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कुलच्या ' दीक्षा आहिरे ' ने घेतली गरुडझेप.....



गोरख पवार वैजापूर औरंगाबाद

 क्रिडा व शैक्षणिक संकुल म्हणून देशभरात नावाजलेल्या आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कुल मधील विद्यार्थ्यांनी प्रत्येक क्षेत्रात दैदिव्यमान कामगिरी करून शाळेच्या नावलौकिकात भर पाडली आहे.

 सालाबादप्रमाणे  ' सिल्वर झोन फाऊंडेशन नवी दिल्ली ' यांच्या मार्फत घेतल्या गेलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत संपुर्ण देशातून शंभर विद्यार्थीनीची निवड करण्यात आली होती, यात सी.बी.एस, इ. ची दीक्षा राहुल अहिरे हिने आपल्या नावाचा शिक्कामोर्तब केला विशेष म्हणजे मागील वर्षी देखील या विद्यार्थ्यांनीने याच परीक्षेत अव्वल येण्याचा बहुमान पटकावला होता या साठी ५००० रु चा धनादेश तिला पारितोषिक म्हणून मिळाला तिच्या या यशा बद्दल संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, कोषाध्यक्ष विठ्ठल होन ,सरचिटणीस हनुमंतराव भोगळे, चेअरमन कांतीलाल पटेल,मुख्याध्यापक नामदेव डांगे,उपमुख्याध्यापिका वंदना थोरात,व्यवस्थापक सुरेश शिंदे,आत्मा मालिक माऊली संत परमानंद महाराज,व समस्त विश्वात्मक परिवार,सर्व शिक्षक वृद यांनी अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment