तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 27 April 2019

पाथरीत रेणुका शुगर परिसरात आग अग्नीशमन गाडी मुळे मोठा अनर्थ टळला


किरण घुंबरे पाटील
पाथरी:-तालूक्याचा पारा ४५ पार होऊन तापमान कमालीचे वाढले असताना तालूक्यात आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. आगीच्या दोन घटना ताज्या असतांनाच शहरालगत असणाऱ्या रेणुका शुगर कारखाना परिसरात गवताला आग लागण्याची घटना शनिवार २७ एप्रिल रोजी दुपारी ४ च्या सुमारास घडली असून सुदैवाने या घटनेच कुठलीही हानी अथवा नुकसान झाले नाही.एक तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यास अग्नीशमन कर्मचाऱ्यांना यश आले.
    २६ एप्रिल रोजी तालुक्यातील अंधापुरी येथे दोन एकर केळीला आग लागून शेतकऱ्याचे जवळपास ३ लाखाचे नुकसान झाले तर, रेनापुर शिवारात आग लागून गायीचे वासरु व कडबा जळून खाक झाला यात शेतकऱ्यांचे सव्वादोन लाखाचे नुकसान झाले या दोन्ही आगीच्या घटना ताज्या असतांनाच शनिवार २७ एप्रील रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास शहरालगत असणाऱ्या देवनांद्रा परिसरातील रेणुका शुगर साखर कारखान्याच्या परिसरात मोठी आग लागली.  दुपारी चार वाजता ही घटना घडली असल्याची माहीती अग्नीशमच्या कर्मचाऱ्यांनी दिली. दिवसभरात ४५ वर तापमान सरकल्याने तापमान वाढले होते. यात दुपारी साडेतीन चार च्या दरम्यान भर उन्हात कारखाना परिसरातील गवताला आग लागल्याने त्यात हवेत जोर असल्याने काही क्षणात ही आग संपुर्ण परिसरात पसरल्याने येथील कर्मचाऱ्यांनी तात्काळ पाथरी नगर परिषदेच्या अग्नीशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना आगीच्या घटनेची माहीती दिली माहीती मिळताच काही क्षणात अग्नीशमन दलाची गाडी घटनास्थळावर दाखल झाली यावरील कर्मचारी यांनी प्रयन्नाची परिकाष्ठा करीत तब्बल एक तासांनंतर आग आटोक्यात आनली.कारखाना परिसरांमध्ये प्रचंड वाळलेले गवत असणाऱ्या सुमारे चार एकर क्षेत्रावर ही आग लागली होती सुदैवाने बाजूलाच असलेल्या साखर गोडाऊन व साखर कारखान्याच्या मुख्य युनिट इमारतीसह शेजारील लोकवस्तीला याची कुठलीही इजा पोहोचली नाही. याच ठिकाणी मोठया प्रमाणात बगॅस साठवलेला असुन त्या ठिकाणा पर्यंत आग जाऊ न देण्यास अग्नीशमन कर्मचाऱ्यांना यश आले. व पुढील मोठी घटना टळली.

No comments:

Post a comment