तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 27 April 2019

सोनपेठ तालुक्यात उष्माघाताने एकाचा मृत्यू


परभणी : प्रतिनिधी

जिल्ह्यात उष्णतेची लाट आली असून आज दि. २७ रोजी सोनपेठ तालुक्यात एका व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 

राज्यात सर्वत्र उष्णतेची तीव्र लाट आहे. अनेक जिल्ह्यात तापमानाने ४० अंश सेल्सिअसचा पारा गाठला आहे. उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला असल्याने नागरिक पुरते हवालदिल झाले आहेत. आज परभणीचे तापमान ४४.५ अंशावर होते या उष्माघातानेच परभणी येथील बोंदरगाव येथील गृहस्थाचा मृत्यू झाला. सोमेश्वर रघुनाथ सपकाळ (वय ४२) असे या गृहस्थाचे नाव आहे. उष्माघातानेच या तरुणाचा मृत्यू झाल्याची नोंद सोनपेठ येथील पोलिस स्टेशनला केली आहे.

परभणी जिल्ह्यात उष्णतेचा पारा गगनाला भिडल्यामुळे सूर्य आग ओकत आहे. याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. सोमेश्वर हे काल, शुक्रवार (दि.२६) रोजी दिवसभर शेतात करत होते. सध्या ज्वारीचे खळे असल्यामुळे ते त्यांच्या शेतातील आखाड्यावर रात्री मुकामास होते. आज सकाळच्या सुमारास त्यांचे चुलत भाऊ शेतातील मोटर चालू करण्यासाठी गेले असता सोमेश्वर झोपलेले दिसले. त्यांना उठवायचा प्रयत्न केला असता ते उठलेच नाहीत. तपासादरम्यान ते मृत्यू पावले असल्याचे निदर्शनास आले. दिवसेंदिवस प्रचंड उष्णता असल्यामुळे त्यांचा मृत्यू उष्माघाताने झाला असल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सोनपेठ पोलिस करत आहे.

No comments:

Post a comment