तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 12 April 2019

राज ठाकरे यांच्या सहा सभांच्या तारखा जाहीर !


बाळू राऊत जिल्हा प्रतिनिधी 
मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे राज्यात ९-१० सभा घेणार असल्याचे त्यांनी गुडीपाडव्याच्या सभेत म्हटले होते. राज ठाकरे यांनी अनके सभांमधून भाजपविरोधात आपली ठाकरी शैली मध्ये खरपूस समाचार घेतला आहे. आणि आगामी सभेमध्ये ही ते आपला निषाणा मोदी सरकार वरच ठेवणार यात तिळमात्र शंका नाही. 
पुढील प्रमाणे असतील राज यांच्या सहा सभा

पहिली सभा- १२ एप्रिल (नांदेड शहर)
राज ठाकरेंची पहिली जाहीर सभा १२ एप्रिल रोजी नांदेड शहरातील नवीन मुंडा मैदानात होणार आहे. 
दुसरी सभा- १५ एप्रिल (सोलापूर)
सोलापूरच्या कर्णिक नगर क्रीडांगणावर सांयकाळी ५:३० वाजताच्या सुमारास राज ठाकरे आपली सभा घेणार आहे. सुमारास राज ठाकरे आपली सभा घेणार आहे. 

तिसरी सभा- १६ एप्रिल (कोल्हापूर)
कोल्हापूरमधील यशोलक्ष्मी मंगल कार्यालयाजवळच्या मैदानात सायंकाळी ५:३० वाजताच्या सुमारास राज ठाकरे आपली तिसरी सभा घेणार आहे. 

चौथी सभा- १७ एप्रिल (सातारा) 
राज ठाकरेंची चौथी सभा साताऱ्यातील जुन्या राजवाड्यासमोरील गांधी मैदानावर होणार आहे. ही सभा सायंकाळी ५:३० वाजता होणार आहे. 

पाचवी सभा- १८ एप्रिल (पुणे)
पुण्यातील सिंहगड रोडवरील शिंदे मैदानावर राज ठाकरे यांची पाचवी सभा होणार आहे.

सहावी सभा- १९ एप्रिल (महाड, रायगड) 
राज ठाकरे आपली सहावी सभा रायगडच्या महाडमधील चांदे मैदानावर घेणार आहे. 

No comments:

Post a Comment