तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 12 April 2019

राकाँ ला आघाडी देण्या साठी जुनेद खान यांची प्रत्येक प्रभागात संवाद सभा

प्रतिनिधी
पाथरी:-राष्ट्रवादी काँग्रेस चे लोकसभेचे उमेदवार राजेश विटेकर यांच्या प्रचारार्थ माजी नगराध्यक्ष तथा न प चे गट नेते जुनेद खान दुर्रांनी दर दिवशी सहका-यां सह प्रत्येक प्रभागात कार्नर संवाद सभा घेऊन राजेश विटेकरांना मतदान करण्याचे आवाहन करतांना दिसून येत आहेत.
पाथरी शहर हे राकाँचा बालेकिल्ला मानला जातो गेली पस्तिस वर्षा पासून आ बाबाजानी दुर्रांनी यांनी लोकांचा विश्वास संपादन करत शहरात वर्चस्व कायम ठेवले आहे. गत पंचवार्षिक आणि चालू पंचवार्षीक मध्ये ही राकाँने विरोधकांना धोबिपछाड देत सर्वच्या सर्व जागांवर विजय संपादन केलेला असून.प्रत्येक वेळी जनतेच्या अडचणीत जातीने लक्ष आणि केलेली विकास कामे या बळावर दर वेळी पाथरी शहरातील नागरीकांनी आ दुर्रानी यांच्या वर विश्वास दर्शवत सत्ता दिली. आ दुर्रांनी राकाँचे जिल्हाअध्यक्ष असल्याने ते मतदार संघात फिरत आहेत. त्या मुळे जुनेद खान दुर्रांनी यांनी शहरातील सुत्रे हाती घेत प्रत्येक प्रभागात काँर्नर सभा घेत जनतेला राकाँला मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. या सभाना जोरदार प्रतिसाद मिळत असून या निमित्ताने जनतेच्या अडचनी ते जाणून घेत आहेत.या सभे साठी नगराध्यक्ष नितेश भोरे,उपनगराध्यक्ष हन्नानखान दुर्रानी,अलोक चौधरी,गोविंद हारकाळ,राजीव पामे,किरण भाले, मुख्तार अली, शेख इरफान, सतिष वाकडे, अजय पाथरीकर,विठ्ठलराव रासवे, कलीम अन्सारी,नसिरेद्दीन सिद्धिकी, शाकेर सिद्दीकी, एजाज खान,इसोफोद्दीन अन्सारी,रिंकू पाटील या नगरसेवकां सह राकाँ शहराध्यक्ष सुनिल उन्हाळे रायुकाँ शहराध्यक्ष शेख खालेद ,राविकाँ शहराध्यक्ष अमोल भाले,माजी नगराध्यक्ष मोईज मास्टर आदी परिश्रम घेत आहेत तर शहरातील देवनांद्रा ग्रामिण मध्ये ज्ञानेश्वर नगर,सागर कॉलनी, नरेंद्र नगर,गुलशन नगर या भागात जि प सदस्य दादासाहेब टेंगसे,पं स सदस्य सदाशिव थोरात, अजय थोरे, सरपंच संतोष सुर्यवंशी, उपसरपंच प्रताप टेकाळे,शेख अशफाक,सुशिल चव्हाळ,डिगंबर लिपने, राविकाँ तालुकाध्यक्ष कार्तिक घुंबरे हे घरोघरी जात राकाँला मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. एकुनच राकाँ पदाधिकारी दारोदारी जात शहर पिंजून काढतांना दिसत आहेत.

No comments:

Post a Comment