तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 10 April 2019

वंचित बहुजन आघाडीत फूट


 बाळू राऊत मुंबई जिल्हा प्रतिनिधी 
माढा :दि 10 वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या एककल्ली काराभाराला कंटाळून अपक्ष उमेदवार सचिन पडळकर यांना पाठिंबा देणार असल्य़ाची भूमिका आघाडीच्या नेत्यांनी घेतली आहे. त्य़ामुळे पहिल्या टप्प्यातील निवड़णुका अगदी उद्यावर आल्यानंतर आता भारिपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले असं म्हणायला हरकत नाही.
दरम्यान, माढातून लोकसभा मतदारसंघ वंचित आघाडीचे उमेदवार विजय मोरे यांना उमेदवारी देताना विश्वासात न घेतल्याचा आरोपही भारिपच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांनी पक्षाच्या नेत्याला पाठिंबा देण्याऐवजी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक सदस्य डॉ. इंद्रकुमार भिसे, शफिक पारकर, आप्पासाहेब करे, जगन्नाथ जानकर यांनी आघाडीमधून फुटून अपक्ष उमेदवार सचिन पडळकर यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांना माढ्यात मोठा धक्का बसला आहे.
बरं इतकंच नाही तर अहमदनगर, शिर्डी इथल्या उमेदवारी देताना प्रकाश आंबेडकरांनी सेटलमेंट केल्याचा आरोपही भारिपच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे आता यासगळ्यावर प्रकाश आंबेडकर काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचं लक्ष आहे

No comments:

Post a Comment