तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 15 April 2019

डॉ बाबासाहेबांची घटना बदलण्याचे षड्यंत्र रचणाऱ्या भाजपाला रोखण्याची चांगली संधी― प्रा.टी.पी.मुंडे
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 


प्रत्येक जाती धर्मातील व्यक्तीला स्वाभिमानाने जगण्याचा व मतदानाचा अधिकार देणारी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली आदर्श घटना बदलण्याचे षड्यंत्र भाजपने रचले आहे त्यांना मताच्या अधिकारतुनच रोखण्याची चांगली संधी आली असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा टी पी मुंडे सर यांनी केले    भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 128 वी जयंती सोहळा आज पंचशील नगर येथे साजरा करण्यात आला पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण व डॉ बाबासाहेबांना अभिवादन केल्यानंतर बोलताना प्रा टी पी मुंडे सर यांनी आज डॉ बाबासाहेब यांच्या घटनेमुळेच उपेक्षित जातीधर्मातील बहुजनातील जनता सुरक्षित आहे विकासाचे शिक्षणाचे स्वातंत्र्य व मतदानाचा अधिकार मिळाला


     हाच सामान्यांचा अधिकार व स्वातंत्र्य हिसकावून हुकुमशाही आणण्यासाठी मोदी– शहा यांच्या भाजपाने घटनाच बदलण्याचे षड्यंत्र रचले आहे त्यामुळे त्यांच्यापासून सावध राहून मताच्या अधिकारातूनच भाजपला रोखा व पुरोगामी विचाराच्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीच्या उमेदवारांना विजयी करा असे आवाहन केले राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री ना पंकजा मुंडे यांनी प्रचार सभेत जाहीरपणे घटना बदलणार असल्याचे सुतोवाच केले होते त्यावरही प्रा टी पी मुंडे सर यांनी पालकमंत्री व खासदार या मुंडे भगिनींच्या कार्यशैलीचा व उदासीनतेचा खरपूस समाचार घेतला


      यावेळी ज्येष्ठ नेते दत्ता सावंत परळी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष तथा मार्केट कमिटीचे उपसभापती प्रा विजय मुंडे सुभाष वाघमारे रमेश मोरे जि प सदस्य प्रदीप भैया मुंडे मलकार वाघमारे श्री तायडे मामा पत्रकार कैलास डुमणे मिलिंद क्षीरसागर बाबासाहेब सोनवणे दासू बनसोडे आर के सरवदे सदाशिव गोरे किरण जगताप उत्तम जोगदंड ऍड मनोज संकाये आत्माराम नागरगोजे भिमराव वाघमारे अण्णा सरवदे राहुल डुमणे विजय जगताप विजय लांडगे बोधी कांबळे विजय सरवदे श्रीमंत कांगणे अजय सरवदे आदी सह महिला युवक पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते


    या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ज्येष्ठ नेते राजन वाघमारे यांनी तर सर्वांचे स्वागत जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रवीण घाडगे यांनी केले सायंकाळी डॉ बाबासाहेबांच्या भव्य प्रतिमेची शहरातून मिरवणूक काढण्यात आली.

No comments:

Post a comment