तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 6 April 2019

सौ.लक्ष्मीबाई अष्टेकर यांचे दुःखद निधन


नगरसेवक अनिल अष्टेकर यांना मातृशोक

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
येथील वीरशैव समाजाच्या ज्येष्ठ महिला कार्यकर्त्या सौ.लक्ष्मीबाई भगवानआप्पा अष्टेकर यांचे आज दिनांक 6 (सहा) एप्रिल रोजी सकाळी 8.30 वाजता अर्धांगवायुमुळे दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्या 55 वर्षे वयाच्या होत्या. परळी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अनिल अष्टेकर यांच्या त्या मातोश्री होत. 

परळी येथील भवानीनगर भागातील रहिवाशी तथा वीरशैव समाजातील ज्येष्ठ महिला सौ लक्ष्मीबाई भगवानआप्पा अष्टेकर यांचे आज दिनांक 6 एप्रिल रोजी सकाळी 8.30 वाजता दुःखद निधन झाले. सौ.लक्ष्मीबाई या अत्यंत मनमिळाऊ व सुस्वभावी असल्याने त्या सर्व परिचित होत्या. वीरशैव समाजातील विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये त्या सहभागी असत. परळी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अनिल अष्टेकर यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात पती भगवान अप्पा, तीन मुले सुनिल, अनिल, दीपक  एक मुलगी ज्योती उबरदंड,  सुना, नातवंडे असा परिवार आहे. आज सायंकाळी पाच वाजता परळी येथील विरशैव स्मशानभूमी मध्ये सौ लक्ष्मीबाई अष्टेकर यांच्यावर अंत्यविधी करण्यात येणार आहेत.

No comments:

Post a Comment