तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 10 April 2019

राजेश विटेकरांना मनसेचा पाठिंबा;पाथरीत मनसे पदाधिकारी राकाँ जिल्हाअध्यक्ष आ दुर्रानी यांच्या उपस्थितीत घोषणा


प्रतिनिधी
पाथरी:-मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई येथील पाडवा मेळाव्यात मोदी विरोधी भुमिका घेत राज्यात काँग्रेस आघाडीला पाठबळ देण्याचे आदेश मनसैनिकांना दिल्या नंतर बुधवारी १० एप्रिल रोजी परभणी लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघातील मनसेचे तीन जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी यांची पाथरी शहरातील हॉटेल सिटी प्राईड येथे राकाँ जिल्हाध्यक्ष आ बाबाजानी दुर्रांनी यांच्या समवेत बैठक होऊन चर्चा झाल्या नंतर मनसे पदाधिकारी यांनी आमचा काँग्रेस पक्षा प्रमाणे फक्त सन्मान ठेवा आम्ही परभणी लोकसभे साठी राकाँचे उमेदवार राजेश विटेकर यांना पाठिंबा देत असल्याचे जाहिर केले.
या बैठकी साठी राकाँ जिल्हाध्यक्ष आ बाबाजानी दुर्रानी मनेसेचे परभणी जिल्हाध्यक्ष रुपेश सोनटक्के, सेलूचे जिल्हाध्यक्ष शेख राज, पाथरीचे जिल्हाध्यक्ष गणेश सुरवसे, मनसे जिल्हाउपाध्यक्ष लक्ष्मणराव रेंगे पाटील, जिल्हा सचिव राहुल कनकदंडे,परतुरचे आकात, निलेश पुरी,मो शफिक, चव्हाण, सचिन पाटील, शेतकरी जिल्हाध्यक्ष गुलाबराव, गणेश निवळकर यांची उपस्थिती होती.या वेळी मनसे पदाधिकारी यांनी आपली मनेगते व्यक्त करून राकाँ उमेदवार यांना या निवडणुकीत पाठिंबा देत असल्याचे जाहिर केले.

परभणी लोकसभेची निवडणुक एक लोक चळवळ झाली-आ बाबाजानी दुर्रानी

मी एक कार्यकर्ता म्हणून आज पर्यंत नऊ लोकसभेच्या निवडणुका पाहिल्या प्रत्येक वेळी भावनिक मुद्दे पुढे करून निवडणुका लढल्या गेल्या आणि जिल्ह्यातील भोळ्याभाबड्या आमच्या जनतेने प्रत्येक वेळी विश्वास ठेऊन मतदान करत निवडुन दिले. मात्र जनतेला काहिच मिळालं नाही हे आता नविन 'स्मार्ट' तरून मंडळींनी आेळखलं आहे. जिल्ह्यात गरीबी आणि बेकारी वाढली असल्याचे आजच्या तरूणांना कळून चुकलं आहे म्हणून ही निवडणुक आता आमची नेत्यांची,कार्यकर्त्यांची नाही राहिली तर ती या मतदार संघातील जनतेनेच प्रतिष्ठेची करत राजेश विटेकरांना निवडुन आनण्या साठी आता लोकचळवळ केली असल्याचे प्रतिपादन या वेळी राकाँ जिल्हाध्यक्ष आ बाबाजानी दुर्रांनी यांनी केले. या मतदार संघातील जनतेने आता भावनिक मुद्दे दुर सारले आहेत शिवसेना पहिले हिंदू-,मुसलमान म्हणून मते मागत होते आता भारत-पाकिस्थान म्हणून मागत आहेत मात्र आता जनतेनेच हा डाव ओळखला आहे. विटेकरांना निवडुन आणण्या साठी जनतेनेच हाती सुत्र घेतले आहेत. आता माझ्या सारखा नेताही विरोधात गेला तरी  उपयोग नाही कारण राजेश दादांची उमेदवारी जनतेत रुजली आहे.असे सांगून प्रत्येक वेळी हिंदू-मुसलमान असे सांगत मतांचा जोगवा मागणा-या या लोकांना आता या वेळी निश्चित जनता धडा शिकवणार असे ते म्हणाले. या देशात मुस्लिमांनी कधीच हिंदु शी संघर्ष केला नाही आणि या पुढेही करणार कारण मुस्लीमांची संख्या देशात  अवघी १३ टक्के असल्याचे सांगुन लोकसभेत केवळ सतरा खासदार आणि विधानसभेत नऊ आमदार आहेत. दहा हजार आएएस अधिका-यां मध्ये ११० आएएस अधिकारी मुस्लिम आहेत. वक्फबोर्डा साठी महाराष्ट्रात मुस्लिम अधिकारी मिळाला नाही तर मग स्पर्धा कुठे आहे तुम्हीच सांगा असा प्रती प्रश्न आ दुर्रानी यांनी करत आज पर्यंत केवळ तीन मुख्यमंत्री मुस्लीम झाल्याचे सांगितले.मुंबई येथे राज साहेबांचे वर्चस्व वाढत असल्याने मुंबई महापालिका हातची जाईल हीच भिती शिवसेनेला आहे. लोकसभेच्या निमित्तान काँग्रेस महा आघाडी सोबत राज साहेबांनी चर्चेची सोयरीक केली आहे. विधानसभेला नक्की एकत्र येऊन हे लग्न होईल आणि ते आमच्या सोबत असतील असा विश्वास ही या वेळी आ दुर्रांनी यांनी व्यक्त केला.या वेळी राज ठाकरे यांची परभणीत सभा घेण्या साठी आपण प्रयत्नशिल असल्याचे त्यांनी सांगितले.मनसे पदाधिका-यांचा राकाँ नक्कीच सन्मान ठेवेल असा विश्वास देत राजेश विटेकरांच्या विजया साठी परभणी लोकसभा मतदार संघातील सर्व मनसे पदाधिका-यांनी एकत्र येत पाठिंबा दिल्याने आ बाबाजानी दुर्रांनी यांनी आभार मानले या बैठकी साठी जालना,परभणी या दोन्ही जिल्ह्यातील शेकडो मनसे पदाधिकारी यांची या वेळी उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment